Aslam Abdul Shanedivan
ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायासह शेळ्या, मेंढ्या पालन व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा घटक ठरला आहे.
मांस, दूध आणि लोकरीसाठी शेळ्या, मेंढ्या यांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पुनरुत्पादन व्यवस्थापन फार गरजेचे असते.
पुनरुत्पादन व्यवस्थापन म्हणजे जनावरांच्या प्रजनन प्रक्रिया आणि वेळा नियोजित करून उत्पादनक्षमता वाढवणे.
मादीच्या गर्भधारणेसाठी पोषक आणि संतुलित आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांचा समावेश केल्यास पिलांची गुणवत्ता वाढते.
जनावरांच्या वंध्यत्वाच्या समस्येचे अडथळे दूर करण्यासाठी पुनरुत्पादन व्यवस्थापन योग्य ठरते. यामुळे जनावरांची प्रजनन क्षमता टिकवता येते.
ऋतुमान आणि हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक पुनरुत्पादनात अडचण निर्माण होतात. तर सतत एकच पुनरुत्पादन केल्यास जनुकीय विविधता कमी होऊन आजारांचा धोका वाढतो.
प्रजननाची योग्य वेळ न साधल्यास जनावरांचे पुनरुत्पादन दर कमी होतो. कमी गुणवत्तेच्या पिल्लांमुळे उत्पादन घटते. ज्यामुळे आर्थिक नुकसान होते.