Nanded News: नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुखेड, भोकर आणि हदगाव या तालुक्यांतील ६२ गावांमध्ये एकूण १ हजार २१२ शेतकरी बाधित झाले असून २९८ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. .जिल्ह्यात चालू आठवड्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीत गहू, ज्वारी, हरभरा तसेच आंबा या पिकांना फटका बसला. जोरदार वाऱ्यामुळे उभे पीक आडवे पडले, तर फळबागांत फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. हिमायतनगर तालुक्यात वादळी पावसात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून कंधार तालुक्यात एक दुधाळ जनावर दगावल्याची नोंद प्रशासनाकडे आहे..Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान.शासनाने तातडीने मदत द्यावीमहसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंतिम अहवालानंतर शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. शासनाने तातडीने मदत जाहीरकरावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा ३७ हजार हेक्टरवरील पिकांना दणका; तातडीने पंचनामे करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश.धर्माबाद, नायगावमध्ये नुकसान, अहवाल मात्र निरंकपावसामुळे धर्माबाद, नायगाव तालुक्यात गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, आंबा या पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. परंतु कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाकडून मात्र अहवाल निरंक पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे..तालुकानिहाय नुकसानमुखेड तालुका : १४ गावांतील १६२ शेतकरी बाधित झाले आहेत. ६२ हेक्टर जिरायती व ६ हेक्टर बागायती असे एकूण ६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.भोकर तालुका : १८ गावांतील तब्बल ९७० शेतकरी बाधित झाले. सुमारे २०० हेक्टर जिरायती पिकांचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे ज्वारी व गव्हाचे पीक आडवे पडले.हदगाव तालुका : एका गावातील ८० शेतकरी बाधित झाले असून ३० हेक्टर बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. फळपिकांमध्ये विशेषतः आंबा बागांना फटका बसला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.