Goat Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : वाढत्या उन्हात शेळ्यांची कशी काळजी घ्याल?

Goat Rearing : दिवसेंदिवस तापमानात वाढ होतेय. हवेतील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होते. त्यामुळे जनावरांची पाणी आणि हिरव्या चाऱ्याची गरज वाढते. वाढत्या उन्हामुळे शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही.

Team Agrowon

Goat Management : दिवसेंदिवस तापमानात वाढ होतेय. हवेतील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होते. त्यामुळे जनावरांची पाणी आणि हिरव्या चाऱ्याची गरज वाढते.  वाढत्या उन्हामुळे शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. असला तरी योग्य प्रमाणात नसतो. त्यामुळे शेळ्यांना आवश्‍यक पोषणतत्त्वे मिळत नाहीत. बहुतांश शेळीपालक शेळ्या दिवसभर बाहेर चरून आल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात.

या पद्धतीमध्ये जो चारा उपलब्ध आहे तोच चारा शेळ्यांना मिळतो. त्यामुळे आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक शेळ्यांना मिळतीलच हे सांगता येत नाही. चांगला आहार न मिळाल्यामुळे शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे आजार होतात. यामध्ये वजन कमी होणे, उष्माघात, मांस उत्पादन घटणे इत्यादी. या समस्या टाळण्यासाठी शेळ्यांच्या आहाराचे आणि आरोग्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्‍यक आहे. वाढत्याउन्हात  शेळ्यांचा आहार कसा असावा  आणि शेळ्यांची कशी काळजी घ्यावी याविषयीची माहिती पाहुया. 

शेळ्यांची कशी काळजी घ्यावी?

शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. त्यासाठी शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चारा द्यावा. मांसवाढीसाठी पूरक घटक चाऱ्यामधून मिळत नाहीत. त्यामुळे चाऱ्यामध्ये  क्षार मिश्रण, प्रतिजैविके मिसळून द्यावीत. चाऱ्यासोबत प्रोबायोटिक्‍सचा वापर केल्यास शेंळ्यांच्या ओटीपोटाला आवश्‍यक असणारे सूक्ष्म जीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढत तसेच शेळीची प्रकृतीही चांगली राहते.

आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात ११ ते ४ या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेळ्यांना सकाळी लवकर म्हणजे ६ ते ९ या वेळेस किंवा संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चरण्यासाठी सोडावे.  

चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्‍यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाऊ घालावा. उन्हाळ्यात चाऱ्यासाठी दूरवर भटकंतीमुळे गरजेप्रमाणे पोषणतत्त्वे न मिळाल्यामुळे शेळ्यांची प्रकृती खालावते. शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावं. २४ तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. गोठ्यात पुरेशी जागा किंवा जास्त जागा उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमानात वाढ होत नाही.

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्‍यक आहे.ज्या शेळ्यांचे केस लांब वाढलेले आहेत त्यांची उन्हाळ्यामध्ये कापणी करावी. शेळ्यांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत आणि घटसर्प रागाचे लसीकरण करुन घ्याव. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर इलेक्‍ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. जेणेकरुन शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही. अशा प्रकारे वाढत्या उन्हात शेळ्यांची काळजी घेतल्यास शेळ्यांचं आरोग्य चांगल राहण्यास मदत होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT