Agrowon
काळजी पशुधनाची

गाभण गाय का आटवितात ?

पशुपालन करत असताना गाभण जनावरांना वेळेत आटविणे, पुढील वेतातील चांगल्या दूध उत्पादनासाठी गरजेचं असते.

Team Agrowon

दुग्धव्यवसायात गाभण गायीला आटवणे (drying of cow) ही या व्यवसायातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण गायीला आटवणे म्हणजे आपण फक्त गायीचे दूध उत्पादन बंद करीत नसतो. तर पुढील वेतासाठी गायीला तयार करत असतो. या काळात कासेतील (udder) दुग्धपेशींना आराम मिळून, त्यांचाट नव्याने ऊर्जा निर्माण होत असते.

शास्त्रानुसार गायीला किमान १०० दिवस तर म्हशीला १२० दिवस आराम मिळाला पाहिजे. याच काळात गर्भाची सुमारे ७० टक्के वाढ होत असते.मात्र गाभण गाय किंवा म्हैस आटवताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. याचा जनावरांवरती ताण येऊ शकतो.

गाय आटवताना

- शेवटच्या दोन – अडीच महिन्यांमध्ये टप्याटप्याने खुराक कमी करावा.

- ओल्या वैरणीऐवजी सुक्या चाऱ्याचे प्रमाण वाढवा.

- दुधाचे प्रमाण कमी होऊ लागताच दुध काढण्याच्या वेळेतील अंतर वाढवावे.

- सुरुवातीला एका वेळेलाच धार काढा.

- प्रमाण कमी होताच एक दिवस आड, नंतर तीन दिवस आड दुध काढणे पूर्ण बंद करा.

- शेवटची धार काढताना सड पूर्ण पिळून घ्या.

- पशुवैद्कीय सल्ल्यानुसार सडामध्ये प्रतिजैविक ट्युब सोडावे.

- आटवताना गोठा व गोठयातील जमिन कोरडी राहील, अशी दक्षता घ्या.

- सडाला किंवा कासेला जखम झाल्यास दुर्लक्ष करु नये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT