Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन’बाबत जिल्हा पशुसंवर्धन विभाग दक्ष

परजिल्ह्यांतील जनावरे, चारा वाहतूक बंद

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी ः याशिवाय तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १० हजार लसी उपलब्ध असून आणखी लसी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील ५० टक्के पदे रिक्त असल्यामुळे या संकटाचा सामना करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची तारांबळ उडणार आहे.

देश आणि राज्याच्या अनेक भागांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात अद्याप या आजाराचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे हा प्रादुर्भाव जनावरांना होऊ नये आणि झाल्यास उपाययोजना करताना कोणतीही कमतरता राहू नये या दृष्टीने जिल्हा पशुसंवर्धन विभागाची जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला तालुका पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली. याशिवाय एखाद्या भागात प्रादुर्भाव जाणवल्यास सर्वांनी सांधिकपणे काम करण्याचा निश्चय केला. या बैठकीनंतर पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर जिल्ह्याबाहेरून होणारी जनावरांची वाहतूक थांबविण्यात यावी असे पत्र दिले. त्यानुसार मंगळवारपासून (ता. १३) आंबोली, करूळ आणि फोंडा या तीन तपासणी नाक्यांवर वाहतूक थांबविण्यात येणार आहे. जनावरांप्रमाणे चारा वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे.

एकीकडे लम्पी स्कीनबाबत उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग दक्ष झाला असला तरी पशुसंवर्धन विभागातील ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे या संकटाचा सामना अधिकारी-कर्मचारी करणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपायांचा वापर केला जात आहे. तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांना प्राथमिक उपचाराचे साहित्य पुरविण्यात आले आहे. पशुपालकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. १० हजार लसी उपलब्ध आहेत. आणखी लसी खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. जनावरांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

- डॉ. विद्यानंद देसाई, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग

पशुसंवर्धन विभागातील पदांची स्थिती

पदनाम एकूण पदे रिक्त पदे

पशुसंवर्धन अधिकारी ३३ ८

सहायक पशुधन अधिकारी ५१ २७

पशुधन पर्यवेक्षक ७२ ३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT