Lumpy Skin
Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘त्यांच्या’ पुढाकाराने विनामूल्य प्रतिबंधात्मक औषधाचे वाटप

टीम ॲग्रोवन

अकोला ः गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून लम्पी स्कीन रोगाच्या (Lumpy Skin Disease) प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतातूर झालेले आहेत. काहींची जनावरेही दगावली. (Animal Death Due To Lumpy Skin) शासनाकडून जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination) केले जात असून पशुपालक आपल्या स्तरावरसुद्धा उपचारासाठी धावपळ करीत आहेत.

जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील शेळद फाटा येथे डॉ. गजानन पाटील टिकार व मुरलीधर राऊत या दोघांच्या पुढाकाराने विनामूल्य प्रतिबंधात्मक औषधाचे वाटप होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून, गावोगावी त्याची वार्ता पसरल्याने विविध जिल्ह्यातील पशुपालक येत आहेत.

लसीकरण केलेल्या जनावरांचे सुधारण्याचे प्रमाण अधिक असले तरी तरी धास्तावलेले पशुपालक घरगुती, आयुर्वेदिक उपायांवरही जोर देत आहेत. अकोला जिल्ह्यात शेळद फाटा येथे असलेल्या हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत यांच्या पुढाकाराने सकाळी ११ ते १२ या एक तासात मोफत औषध पुरवले जाते.

डॉ. गजानन पाटील टिकार यांनी तयार केलेल्या या औषधाचा अकोला, बुलडाणा, वाशीमसह लगतच्या जिल्ह्यांतील असंख्य पशुपालकांनी उपयोग केला.

‘औषध द्या, उपचार बंद करू नका’

या आयुर्वेदिक औषधाचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. हे औषध देत असताना पशुवैद्यकीय उपचार जर सुरू असतील तर तेही बंद करू नका, असे या ठिकाणी वारंवार पशुपालकांना सांगितले जाते. आजवर औषधाचा वापर केलेल्या एकाही पशुपालकांची तक्रार तर नाहीच उलट जनावर बरे झाल्याचे अनेकांचे फोन येत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. ही औषधी गाठेवर लावण्यात येते शिवाय चारा खात नसलेल्या जनावराला पोटातून देण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT