Animal care Agrowon
काळजी पशुधनाची

Unproductive Cattle : भाकड पशुधन सांभाळणे आवाक्याबाहेर

Animal Care : भाकड गायी आणि नर पिल्लांचे करायचे काय? हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

Team Agrowon

Pune News : भाकड गायी आणि नर पिल्लांचे करायचे काय? हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या अनुत्पादक पशुधनाला सांभाळणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. गोहत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गोरक्षक आग्रही आहेत.

त्यामुळे एकीकडे हे भाकड पशुधन विक्री करण्यासाठी कायदेशीर बंदी आहे. तर ते सांभाळण्याची आर्थिक ताकद शेतकऱ्यांमध्ये नाही. गोशाळांमध्ये असे पशुधन ठेवण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे भाकड संकरित गायी आणि त्यांना होणाऱ्या नर वासरांचे करायचे काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

दौंड तालुक्यात संकरित गायींची संख्या सुमारे ९० हजार आहे. यातील सुमारे ५० हजार गायींना दर वर्षी एक याप्रमाणे ५० हजार पिल्ले होता. नैसर्गिक तत्त्वानुसार यापैकी निम्मी म्हणजे सुमारे २५ हजार पिल्ले नर जातीची असतात. संकरित वाणांच्या वासरांचा आहार देशी वासरांच्या तुलनेत जास्त असतो. सुरुवातीच्या काळात या वासरांचे पोषण केवळ दुधावर असल्याने दूध उत्पादनात मोठी घट येते.

दौंड तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची पर्यायाने संकरित गायींची संख्या मोठी आहे. त्यामुळे वर्षाकाठी पंचवीस हजारांहून अधिक नर वासरे आणि दहा ते पंधरा हजार भाकड गायी इतक्या मोठ्या संख्येने पशुधन अंगावर पोसण्याची वेळ येत आहे. हे पशुधन चोरून लपून विकावे तर गायीप्रेमी किंवा पोलिसांचा ससेमिरा चुकवावा लागतो. म्हणून घेणारे ते मातीमोल भावानेच घेतात. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

सोडून दिलेल्या नर वासरांच्या संख्येत वाढ

दुष्काळी परिस्थितीमुळे वासरांना सांभाळणे शेतकऱ्यांना एक तर परवडत नाही आणि गोहत्या बंदी कायद्यामुळे त्यांची रीतसर विक्रीही करता येत नाही. गावोगावी अशी सोडून दिलेली नर वासरे वाढत चालली आहेत.

भविष्यात शेतीच्या पिकांसाठी ही मोठी समस्या उद्भवू शकते. या समस्येचा शासन दरबारी कुठलाच विचार होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आमची या समस्येतून सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे हे शेतकरी म्हणत आहेत. राजकीय व्यक्तीसमोर या प्रश्नांची चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ते कानावर हात ठेवत आहेत.

गोहत्या बंदी कायदा हा देशी गोवंशापुरता मर्यादीत केला तर संकरित जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळू शकते. मांस उत्पादनासाठी म्हशींना बंदी नाही. त्यामुळे त्यांची पारडे आणि भाकड म्हशींना अजही चांगला बाजार मिळत आहे. संकरित गायी मात्र मातीमोल भावाने घेतल्या जातात. त्यांची वासरे तर फुकटातच नेली जातात. देशी गोवंश बंदीला आम्हा कोणाही दूध उत्पादकाचा विरोध नाही. मात्र संकरित वाण हे दूध उत्पादनासोबत मांस उत्पादनासाठीही गृहीत धरला पाहिजे.
- नवनाथ कोडीतकर, आदर्श गोपालक पुरस्कार विजेते (जावजीबुवाची वाडी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT