Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : वसुबारसेला ग्रामपंचायतींकडून गोठे, परिसराची स्वच्छता

लम्पी स्कीन आजाराची लागण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : ग्रामीण भागात पशुपालन (Animal Husbandry) हा हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. त्यामुळे गोवर्गीय जनावरांची संख्यादेखील मोठी आहे. वसुबारस सणाच्या (Vasubaras Festival) दिवशी गाय व वासराची पूजा करण्याची पद्धत ग्रामीण भागात रूढ आहे. याच दिवशी गोवर्गीय जनावरांना लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराची लागण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याने लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी प्रभावी ठरणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णु गर्जे (Vishnu Garje) यांनी दिली.

जनावरांमधील लम्पी स्कीन हा आजार डास, कीटक, गोमाश्या, गोचिड यांच्या चाव्याने व बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्काने होतो. त्यामुळे या आजाराच्या नियंत्रणासाठी गोठ्यांची साफसफाई, गोचिड, डास, बाह्य कीटकांचे निर्मूलन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या वतीने देण्यात आले होते. यालाच अनुसरून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली असून दिवाळीपूर्वी वसुबारस सणाच्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात येणार आहे.

लम्पी स्कीन आजार डास, कीटक, गोमाश्या, गोचिड यांच्या चाव्याने होतो या कीटकांचा वावर हा सर्वत्र असतो एका ठिकाणी निर्जंतुकीकरण केल्यास त्याभागातून दुसऱ्या ठिकाणी कीटक, गोमाश्या, गोचिड यांचा प्रसार होण्याची शक्यता असते यासाठी ग्रामपंचायतींत स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

जनावरांचे ९३.८८ टक्के लसीकरण पूर्ण नाशिक जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रम आणि लसीकरण मोहीम यांसह प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण आठ लाख ९५ हजार पन्नास गोवर्गीय जनावरे असून यापैकी आठ लाख ४० हजार तीनशे ९३ जनावरांचे ९३.८८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay: मॉन्सूनच्या विलंबाने खरीप हंगामाला फटका

SMART Rooftop Solar Scheme: अवघ्या २५०० रुपयांत सौर प्रकल्प

Kharif Sowing: मराठवाड्यात खरीप पेरणी अद्याप रखडलेलीच

Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज

Crop Insurance Compensation: पीकविम्याची रक्कम दहा दिवसांत द्या; अन्यथा सरण आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

SCROLL FOR NEXT