Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : 'लम्पी स्किन'मुळे मृत्यू झाल्यास मदत

‘लम्पी स्कीन’ आजाराचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात तातडीने लसीकरण मोहीम राबवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पशुसंवर्धन विभागाचे मुख्य सचिव जे. पी. गुप्ता यांना दिले.

टीम ॲग्रोवन

मुंबई : ‘लम्पी स्कीन’ आजाराचा (Lumpy Skin Disease) मुकाबला करण्यासाठी राज्यभरात तातडीने लसीकरण मोहीम (Animal Vaccination Drive) राबवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पशुसंवर्धन विभागाचे (Department Of Animal Husbandry) मुख्य सचिव जे. पी. गुप्ता यांना दिले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जनावरांना ‘लम्पी स्कीन’ या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला ‘लम्पी स्कीन’ आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल, हे लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृतीसाठी करावी. तसेच रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवावी. तसेच बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. यासाठी संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या भागात पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पशुपालकांसाठी टोल फ्री क्रमांक

‘लम्पी स्कीन’ आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ देण्यात आला आहे, अशी माहितीही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT