Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा

नांदेड : जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ती गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव दिसून आल्याने ती गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. लम्पी आजारावर नियत्रंण (Lumpy Skin Control) व प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील पशुधनास लम्पी स्कीन आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी १०० टक्के लसीकरण ३० सप्टेंबर पर्यत पूर्ण करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी परदेशी यांनी गुरुवारी (ता. २२) लिंबगाव येथे रोगप्रतिबंधक लसीकरण कॅम्पला भेट देवून पशुपालकांची विचारपूस केली. तसेच गोचीड, गोमाशापासून गोठे फवारणी करून घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.

पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी रोगाच्या संदर्भात पशुपालकांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून लसीकरणासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लसीकरण प्रक्रियेत कोणीही दुर्लक्ष करता कामा नये अन्यथा त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी आढावा बैठकीत दिला.

जिल्ह्यातील १९ गावांतील ७१ जनावरे बाधित..

आजच्या स्थितीत नांदेड जिल्ह्यात एकूण १९ गावे बाधित झाली आहेत. या बाधित गावांतील पशुधन संख्या (गाय वर्ग) १० हजार १३८ एवढी आहे. यातील लम्पी बाधित पशुधन संख्या (गाय वर्ग) ७१ एवढी आहे. बाधित गावाच्या ५ किमी परिघातील गावांची संख्या १३८ एवढी झाली आहे. एकूण गावे (बाधित अधिक ५ किमी परीघ) १५७ गावातील पशुधनाची संख्या ही ४८ हजार २४९ एवढी आहे. यात बाधित व परिघाच्या गावातील पशुधनाची संख्या ५८ हजार ३८७ एवढी गणण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT