Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : जनावरे दगावल्यामुळे पशुपालकांना ८० हजारांची मदत

तीन जनावरांसाठी ८० हजार रुपये आर्थिक मदत संबंधीत पशुपालकांना देण्यात आली आहे. आजवर लम्पी स्किनमुळे बाधित ११८ पैकी ८८ जनावरे या आजारातून बरी झाली आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी : लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy Skin Disease) रविवार (ता. ९) पर्यंत परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तीन जनावरांसाठी ८० हजार रुपये आर्थिक मदत संबंधीत पशुपालकांना (Cattle Breeders) देण्यात आली आहे. आजवर लम्पी स्किनमुळे बाधित ११८ पैकी ८८ जनावरे या आजारातून बरी झाली आहे.

२५ जनावरांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा या तालुक्यातील बाधित गावे ३५ गावांतील ११८ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

बाधित क्षेत्रातील परिघातील गावांची संख्या १६१ आहे. सावरगाव तांडा (ता.जिंतूर), मानोली (ता.मानवत), धनगर टाकळी (ता.पूर्णा) येथील बैल, परभणी येथील एक गाय, हिवरा (ता.पूर्णा) येथील वासरू असे एकूण ५ जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

बैलासाठी २५ हजार रुपये, गाईसाठी ३० हजार रुपये तर वासरासाठी १६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. आजवर मानवत आणि पूर्णा तालुक्यातील पशुपालकांना एकूण ८० हजार रुपये मदत देण्यात आली आहे.

‘लम्पी स्कीन’च्या लसीकरणाची स्थिती अशी..

परभणी जिल्ह्यात गायींची संख्या १ लाख ३७ हजार १५०, बैलांची संख्या १ लाख ६२ हजार ७११ आणि म्हशींची संख्या ९८ हजार ४९५ एवढी आहे. जिल्ह्यातील ८४९ पैकी ३५ गावांतील जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

बाधित गावांपासून ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या१६१आहे. लसीकरण करावयाच्या गोवंशीय जनावरांची संख्या २ लाख ९९ हजार ८६१ आहे. त्यात १ लाख ३७ हजार १५० गायी आणि १ लाख ६२ हजार ७११ बैल यांचा समावेश आहे. आजवर २ लाख ८३ हजार २२९ (९४ टक्के) जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

Soybean Farming: खेडच्या पूर्व भागामध्ये सोयाबीनला नवसंजीवनी

Kharif Season Crisis: पिके तहानली; उपसाबंदीने शेतकऱ्यांची कोंडी

Agriculture Department Staffing Plan: कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द

Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा

SCROLL FOR NEXT