Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ...साहेब तुम्ही आलात, म्हणून ते इथे आलेत

पशुपालकांनी पशुसंवर्धन मंत्र्यांसमोर वाचला अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पाढा

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : जनावरांच्या मृत्यूने बेहाल झालेल्या पशुपालकांच्या संतापाचा बांध पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्यासमोर फुटला. सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने ‘लम्पी स्कीन’चे (Lumpy Skin) प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, यामुळे अतिग्रेसारख्या एकाच गावात १५ हून अधिक जनावरांचा मृत्यू (Animal Died Due To lumpy Skin) झाला. या सर्व मृत्यूला पशुवैद्यकीय अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.

पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे पाटील यांनी सोमवारी (ता. २६) जिल्ह्यात सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. या वेळी ग्रामस्थांनी विभागाकडून ‘लम्पी स्कीन’ची दखल घेण्यासाठी मोठी दिरंगाई झाल्याचा आरोप केला.

गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘लम्पी स्कीन’ने शिरकाव केला आहे. याची कल्पना ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना देताच अधिकाऱ्यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नाही. एकाच सुईने जनावरांना लस देण्याचा प्रकारही झाला. अशा दिरंगाईमुळे गावामध्ये लम्पी स्कीन आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वेळेवर लक्ष न दिल्याने लाखो रुपयांच्या जनावरांचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याची व्यथा ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांच्यासमोर मांडली.

अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोठ्याची पाहणी करण्यासाठी गावात येणार आहे असे सांगितले, पण ते आजपर्यंत आले नाहीत. आज तुम्ही आला आहात म्हणून सर्वजण इथे आलेत, अन्यथा इतर वेळी स्थानिक कर्मचाऱ्यांवरच जबाबदारी ढकलण्याचा या अधिकाऱ्यांचा प्रयत्न राहत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी विखे पाटील यांच्यासमोर केला.

‘‘सुरुवातीच्या काळात थोडेसे दुर्लक्ष झाले. परंतु ज्या वेळी कळाले त्या वेळी पशुसंवर्धन खात्याने लसीकरणासह अन्य उपचार केल्याचे’’ पशुसंवर्धन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विखे पाटील यांना सांगितले.

अधिकारी झाले निरुत्तर

अधिकाऱ्यांनी आजार कमी असल्याचे दाखवण्यासाठी जनावरांच्या मृत्यूची आकडेवारी ही कमी दाखवल्याचे ग्रामस्थांनी श्री. विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. या तक्रारीने व्यथित झालेल्या श्री. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. इतके गांभीर्य आहे, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का भेटी दिल्या नाहीत असा सवाल श्री. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केला. या वेळी अधिकारी मात्र निरुत्तर झाल्याचे चित्र दिसून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT