Animal Buying Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Selection: नवीन जनावर खरेदी करताय? मग ही माहिती लक्षात ठेवा

आपल्या भागातील वातावरणात कोणत्या जातीचे जनावर राहू शकेल याचा आधी विचार करावा. जनावर खरेदी करताना पूर्व नोंदीवरून, बाह्य गुणावरून आणि प्रत्यक्ष दर्शनीय गुणावरून दुधाळ जनावराची निवड करावी.

Team Agrowon

तुम्हाला जर उत्तम पशुपालक व्हायच असेल तर आधी तुम्हाला उत्तम जनावरांची निवड (Animal Selection) करता आली पाहिजे. नविन जनावर विकत घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

आपल्या भागातील वातावरणात कोणत्या जातीचे जनावर राहू शकेल याचा आधी विचार करावा. जनावर खरेदी (Animal Buying) करताना पूर्व नोंदीवरून, बाह्य गुणावरून आणि प्रत्यक्ष दर्शनीय गुणावरून दुधाळ जनावराची निवड करावी.

जनावरांचे वय तसेच सरासरी उत्पादन क्षमता यावरून जनावरांची निवड करणे सोयीचे होते. यासाठी मात्र जनावरांच्या नोंदणी असणं आवश्यक आहे. जनवरांच्या बाह्य अंगावरुन जनावरांची उत्पादन क्षमता लक्षात येते.

जनावरांची नोंद नसल्यास दुधाळ जनावरांच्या लक्षणावरून त्यांची निवड करता येते. त्यासाठी जनावरामध्ये कोणती ठळक लक्षणे पाहावीत याची माहिती पाहुया.

जनावरांची छाती जर अधिक रुंद असेल तर रक्ताभिसरण अधिक होते म्हणजे असे जनावर शेतीकामासाठी सक्षम आहे असे समजावे. अशा गायींच दूध उत्पादनही चांगले असते.

जनावरांचे मागील दोन पायातील अंतर अधिक असल्यास जनावराच्या कासेच्या वाढीसाठी भरपूर जागा मिळते.

गर्भाशयाचा आकार वाढल्याने गर्भाची वाढ भरपूर होते व वासराच्या जन्माच्या वेळी वजन जास्त असते. त्यामुळे वासराच्या मरतुकीचे प्रमाणही कमी होते.

- भाकड जनावर खरेदी करत असाल तर त्याच्या कासेवर कातडीच्या घड्या असाव्यात म्हणजे जनावर दुधावर असल्यास त्याची कास किती मोठी होऊ शकते याची कल्पना येईल.

- दुधाळ जनावरांना खालच्या पोटाच्या बाजूने बघितल्यास एक मोठी शीर दिसते तिला दुधाची शीर म्हणतात. ही जितकी जाड व वळणावळणाची असेल तितके जनावर जास्त दूध देणारे समजावे.

- दुधाळ जनावरांना मागील दोन्ही पायाच्या बाजूने बघताना कासेचा त्रिकोणी भाग जितका ठळकपणे दोन्ही पायातून दिसेल तितके दुधाळ जनावर समजावे.

वरील सर्व व्यावसायिक बाबी लक्षात घेता जातीवंत जनावरे आपल्या गोठ्यात निर्माण करणं हाच एक सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. याकरिता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वंश हरविलेल्या गाई म्हशींच ग्रेडिंग तंत्रज्ञानानुसार वर्गीकरण करावं.

अधिक दूध उत्पादन करणाऱ्या देशी गायी आणि म्हशीच्या जातीपासून कृत्रिम रेतनाद्वारे कृत्रिम रेतन केल्यास तो एक शाश्वत पर्याय ठरू शकतो.

याकरिता आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन गाईच्या गिर, साहिवाल, देवणी आणि म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाना, सुरती जातींचे रेतन उपलब्ध करून घेत आपल्या जनावरांपासून भविष्यातील चांगल्या कालवडी निर्माण करता येतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Quality Export Banana: धाराशिव जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी पोषक; कोपार्डेकर

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू

Karnataka Sugarcane Protest: बेळगावात ऊसदर आंदोलन पेटले, हत्तरगी टोल नाक्याजवळ दगडफेक, मंत्र्यांच्या कारवर चप्पला भिरकावल्या

Agrowon Podcast: हरभऱ्याचे भाव कमीच; मक्याचा भाव दबावातच, सोयाबीन भाव स्थिर, कापूस तसेच मिरचीचे दर टिकून

Agriculture Loan: कर्जमुक्‍त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची उपलब्धता करा

SCROLL FOR NEXT