Team Agrowon
कालवडीला वेळेत, भरपूर आणि दर्जेदार चीक मिळाल्यास भविष्यात कालवड संगोपन सोपे होते.
अनेक पशुपालक वार पडल्याशिवाय कालवडीला चीक पाजत नाहीत. तसे न करता एक तासाच्या आत दीड ते दोन लिटर चीक पाजावा
कोवळी खुरे जास्त वाढलेली असल्यास ती खरवडून काढून टाकावीत. म्हणजे कालवडीला उभे राहणे तसेच चालणे सोपे होईल. कालवडीचे वजन नोंदवून ठेवावे.
कालवडीला गाईबरोबर ठेवून तिला दूध काढण्याआधी आणि नंतर सरळ कासेतून दूध पाजले जाते.या पद्धतीत गाईचे आणि कालवडीचे दृढ संबंध तयार होतात.
कालवडीने अधिक दूध पिल्यास संगोपनावरचा खर्च वाढतो. कमी दूध पिल्यास योग्य वाढ होत नाही.