Red Kandhari Agrowon
काळजी पशुधनाची

Red Kandhari Conservation : ‘लाल कंधारी’ प्रक्षेत्रास जाती संवर्धन पुरस्कार

Indigenous Cow Research : परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयामार्फत लाल कंधारी या बहुउद्देशीय देशी गोवंशाची प्रजनन व दूध उत्पादन क्षमता वाढावी, या दृष्टीने संशोधन केले जाते.

Team Agrowon

Parbhani News : परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील लाल कंधारी संशोधन प्रक्षेत्रास लाल कंधारी गोवंश संवर्धनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधने विभागाचा ‘जाती संवर्धन पुरस्कार २०२३’ जाहीर झाला आहे. शनिवारी (ता. २३) किसानदिनी आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयामार्फत लाल कंधारी या बहुउद्देशीय देशी गोवंशाची प्रजनन व दूध उत्पादन क्षमता वाढावी, या दृष्टीने संशोधन केले जाते. प्रक्षेत्रावर मागील ५१ वर्षांपासून लाल कंधारी वंशाच्या शुद्ध जातीचे जतन केले जाते.

या गोवंशाच्या संवर्धन आणि प्रसारासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नॅशनल ब्यूरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस या संस्थेकडून लाल कंधारी गोवंशाला ‘इंडिया कॅटल ११००-आरके-०३२४’ हा राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी क्रमांक मिळाला आहे.

रेतमात्रा निर्मितीसाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागास लाल कंधारी वळू पुरविले जातात. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब नरळदकर, संशोधन उपसंचालक डॉ. सुहास अमृतकर, प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. श्रीनिवास कटकुरी, डॉ. तुकाराम भुक्तार यांनी कुलगुरू डॉ. नितिन पाटील, संशोधन संचालक डॉ. नितिन कुरकुरे, अधिष्ठाता डॉ. शिरिष उपाध्ये, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, महाविद्यालयाचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितिन मार्कंडेय यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT