Livestock market 
काळजी पशुधनाची

Livestock Market : प्रतिबंधित पशुबाजार, गुरांची वाहतूक पूर्ववत

जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लम्पी स्कीनकरिता २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे.

Team Agrowon

नंदुरबार ः लम्पी स्कीनच्या (Lumpy Skin) प्रार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकानिहाय आढावा बैठकीत जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील प्राणी बाजार (Livestock Market) भरविणे व जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक (Animal Transport) अटी व शर्तींसह सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहेत.

जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लम्पी स्कीनकरिता २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी गोजातीय प्रजातींच्या कानात टॅग क्रमांक असणे, तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक राहील.

संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ते देण्यासाठी राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

गुरांची वाहतूक करताना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ४७ अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्रसोबत बाळगणे आवश्यक राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, प्रक्षेत्रे व पशुबाजारामध्ये यापुढे टॅगिंग व रोगप्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय गुरांची खरेदी-विक्री करू नये.

आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था व अन्य आनुषंगिक प्रशासकीय विभागाने आदेशाचे पालन करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे आता हे बाजार भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT