Livestock Market | Lumpy Skin Disease | Milch Animal Rate Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : बाजार सुरु होताच दुभत्या जनावरांचे दर वाढले

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गुरांचे बाजार भरण्यावर चार महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र आता लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व जवळपास सर्वच जनावरांचे लसीकरण झाले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत असल्याने गुरांचे बाजार भरण्यावर चार महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र आता लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व जवळपास सर्वच जनावरांचे लसीकरण (Animal Vaccination) झाले आहे. त्यामुळे अनेक अटींच्या अधीन राहून राज्यात पहिल्यांदाच नगर जिल्ह्यात गुरांचे बाजार (Livestock Market) सुरु करण्याला परवानगी मिळाली. त्यानंतर झालेल्या पहिल्याच बाजारात दुभत्या जनावरांच्या (Milch Animal Rate) दरात २० टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यात गाईंसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणी (ता. राहाता) म्हशीसाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील बाजारात पहिल्याच बाजारात कोट्यवधीची उलाढाल झाली आहे.

राज्यात साधारण सहा महिन्यांपूर्वी लम्पी स्कीनच्या आजाराची जनावरांना प्रादुर्भाव होऊ लागली. गेल्यावर्षीही हा प्रादुर्भाव सुरु होता. परंतु यंदा त्याची तीव्रता अधिक राहिली. ज्या गावांत बाधित जनावरे आढळून येत होती. त्या गावांसह पाच किलोमीटर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते होते. राज्यातील जनावरांचे बाजार बंद केले होते.

त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना व बाजारावर अवलंबून असलेल्या घटकांना बसला. दुभत्या गाईंचे दरही पडले. महिनाभरापूर्वी म्हशीचे बाजार भरण्याला परवानगी दिली, परंतु गाईंचे व म्हशीचे बहुतांश ठिकाणी बाजार एकत्रच असल्याने ते सुरु झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाजार सुरू करण्यास परवानगी मिळाली.

बुधवारी लोणी (ता. राहाता) येथील गाईंचा बाजार भरला. पहिल्याच बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे चार कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली. शुक्रवारी म्हशीसाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगावात १६५० जनावरे विक्रीला आली.

त्यातील १३०८ जनावरांची खरेदी-विक्री होऊन दीड कोटींची उलाढाल झाली. शनिवारी (ता.२४) काष्टीचा बाजार झाला. तेथेही मोठी खरेदी-विक्री झाली. बाजार बंद असल्‍याने स्थानिक पातळीवर चोरुन जनावरांची खरेदी-विक्री होती. मात्र खरेदीदार दर पाडून घेत होते. बाजार सुरु झाल्याने दुभत्या जनावरांच्या दरात वीस टक्के वाढ झाली.

...असे मिळाले दर (बाजार बंदच्या काळातील दर (कंसात)

दुभती गाय ः ७० हजार ते १ लाख (५० हजार ते ७० हजार)

गाभण गाय ः ६० हजार ते ९० हजार (४५ हजार ते ७० हजार)

दुभती व गाभण म्हैस ः ६० हजार ते एक लाख (४० हजार ते ८० हजार)

(बाजारातून मिळालेली माहिती, दर कमी-जास्त होऊ शकतो)

जनावरांचे बाजार बंद असल्याने शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समितीचेही नुकसान होत होते. बाजार सुरु झाल्याने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांत उत्साह दिसून आला. गाईंचे दरही वाढले आहेत.

- उद्धव दरेकर, सचिव, बाजार समिती, राहाता, जि. नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-Us Trade Deal : अमेरिकेचा नवसाम्राज्यवाद आणि दादागिरी

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT