Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ ‘इन्सिडंट कमांडर’ नियुक्ती

जळगाव जिल्हा लम्पी रोगासंबंधी राज्यात हॉटस्पॉट ठरला आहे. यंत्रणा कुचकामी ठरली. यामुळे राज्यात सर्वाधिक पशुधन जळगावात मृत्युमुखी पडली.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज (Lumpy Skin Disease) आढळला आहे. जिल्ह्यात आजार गंभीर स्थितीत असून, आतापर्यंत अनेक पशुधनांचा मृत्यू (Livestock Died Due To Lumpy Skin) झाला आहे. लम्पीचा आणखी उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पंधरा तालुक्यांत पंधरा ‘इन्सिडंट कमांडर’ (Incident Commander To Prevent lumpy Skin Disease) नेमले आहेत. त्यांनी संबंधित तालुक्यात उपाययोजना करून लम्पी आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत, असे प्रशासन म्हणत आहे. पण ‘इन्सिडंट कमांडर’ नियुक्ती म्हणचे उशिरा सुचलेले शहाणपण, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जळगाव जिल्हा लम्पी रोगासंबंधी राज्यात हॉटस्पॉट ठरला आहे. यंत्रणा कुचकामी ठरली. यामुळे राज्यात सर्वाधिक पशुधन जळगावात मृत्युमुखी पडली. यामुळे पशुधनपालकांत संताप आहे. आता केलेले उपाय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपन अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत. पशुधनाच्या उपचारात पशुधन पालकांची मोठी लूट झाली असून, ते वित्तीय अडचणीत आहेत. त्यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

तालुकानिहाय ‘इन्सिडंट कमांडर’ असे

(तालुका व इन्सिडंट कमांडर याप्रमाणे)

जळगाव- निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अमळनेर- उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, भुसावळ- उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जामनेर-उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, चोपडा- उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पारोळा- जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, बोदवड- उपजिल्हाधिकारी किरण सावंत

एरंडोल- उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, धरणगाव- जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, मुक्ताईनगर- उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, चाळीसगाव- जिल्हा कार्यक्रम अधिकारी (जिल्हा परिषद) देवेंद्र राऊत, पाचोरा- कृषी उपसंचालक अनिल भोकरे, यावल- प्रकल्प संचालक (आत्मा) कुरबान तडवी, भडगाव- समाजकल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, रावेर- कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT