Raju Shetti  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : जनावरांचा तातडीने विमा उतरवावा ः शेट्टी

‘लम्पी स्कीन’च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्वंच जनावरांचा येत्या दहा दिवसांत तातडीने विमा उतरविण्यात यावा. जेणेकरून, एखादे जनावर दगावल्यास संबंधित पशुपालकास अर्थसाहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल,’’ अशी मागणी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी केली.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy Skin) पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्वंच जनावरांचा येत्या दहा दिवसांत तातडीने विमा (Animal Insurance) उतरविण्यात यावा. जेणेकरून, एखादे जनावर दगावल्यास संबंधित पशुपालकास अर्थसाहाय्य (Compensation) मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल,’’ अशी मागणी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.

गुजरात, हरियाना, राजस्थान व झारखंडनंतर लम्पी स्कीन या आजाराने राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. केंद्र व राज्य सरकार या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरत आहे. या आजारात जनावरे दगावण्याची शक्यता आहे. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. तातडीचे उपाययोजना म्हणून येत्या दहा दिवसांत लसीकरणाचा साठा पुरवावा. खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकारने राज्यातील सर्व पशुधनाचा तातडीने विमा उतरवावा.’’

‘‘देशी जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आजाराचा संसर्ग होत आहे. राज्यात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. बाजारांमध्ये जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या आजाराने जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसेल,’’ अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली.

‘डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी’

‘‘आजारातील देशी जनावरांच्या मृत होण्याच्या टक्केवारीचे प्रमाण जवळपास १० टक्क्यांपर्यंत गेले आहे. मात्र संबंधित राज्य सरकारकडून अपयश लपविण्यासाठी चुकीची आकडेवारी दर्शविली जात आहे. या आजारामुळेच देशामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. राज्यात पशुसंवर्धन विभागात डॉक्टरांची पदे भरलेली नसल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे,’’ असेही शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT