Cattle Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : ऊस तोडणी वाहतुकीसाठीच्या जनावरांचेही लसीकरण होणार

यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून जनावरे दाखल होणार असल्याने या जनावरांच्या लसीकरणाचे नियोजन समन्वयाने करावे, असे आवाहन गोकुळ दूध संघाच्या बैठकीत करण्यात आले.

टीम ॲग्रोवन

कोल्‍हापूर : यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून जनावरे दाखल होणार असल्याने या जनावरांच्या लसीकरणाचे नियोजन समन्वयाने करावे, असे आवाहन गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk Orginisation)बैठकीत करण्यात आले. कोल्हापूर जिल्‍हा स‍हकारी दूध उत्‍पादक संघ लि., कोल्‍हापूर (गोकुळ) येथे संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारावरील उपचार व लसीकरणाबाबत (Lumpy Vaccination)संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील व संचालक मंडळाने पशुसंवर्धन (Livestock) विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.

श्री. पाटील म्हणाले, की लम्पी स्कीन त्वचा आजारावरील लसीकरणासंदर्भात गोकुळ व शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सामुदायिक काम करणे गरजेचे आहे. शासकीय अधिकारी व गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वय साधून बैठक घेणे व वस्तुनिष्ठ माहितीची चर्चा होणे महत्त्वाचे आहे. यामुळे जिल्ह्यातील लम्पी स्कीन लसीकरणाची मोहीम वेगाने पूर्ण होईल. १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होणार असून इतर जिल्ह्यातील ऊस वाहतुकीसाठी बैल व इतर जनावरे जिल्ह्यात येणार आहेत.

येणाऱ्या जनावरांची योग्य ती नोंद घेऊन लसीकरण करण्यासाठीचे नियोजन करावे व खास करून शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत व कर्नाटक सीमा भागातील संघाच्या वैद्यकीय अधिकारी यांना लक्ष्‍य देण्याच्या सूचना दिल्या. पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व संचालक शशीकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, संचालिका शौमिका महाडिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार व संघाचे अधिकारी यांनी लम्पी स्कीनसंदर्भात विविध विषयांवर सवांद साधला.

कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यू. व्‍ही. मोगले, सहायक व्‍यवस्‍थापक डॉ. पी. जे. साळुंके, सहायक व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश दळवी, पशुवैद्यकीय अधिकारी, एल. एस. एस. व कृत्रिम रेतन सेवक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT