Animal Shelter Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Shelter : मुक्त संचार गोठा फायद्याचा का आहे?

दुग्ध व्यवसायामध्ये सध्याच्या ठाणबंद पद्धतीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन करताना अधिकाधिक वेळ गोठ्याची स्वच्छता व जनावरांच्या स्वच्छतेमध्ये जातो.

Team Agrowon

दुग्ध व्यवसायामध्ये सध्याच्या ठाणबंद पद्धतीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन (Animal Management) करताना अधिकाधिक वेळ गोठ्याची स्वच्छता व जनावरांच्या स्वच्छतेमध्ये जातो. ठाणबंद पद्धतीमध्ये गाई, म्हशींना एकाच जागी बांधल्यामुळे काही समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायांच्या सांध्याचे, खुरांचे आजार, कासेचे आजार, गर्भाशयाचे आजार इत्यादी मोठे आजार संभवतात. वरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पशुपालकांचा अधिक पैसा व वेळ वाया जातो. यावर खात्रीशीर उपाय म्हणजे मुक्त संचार पद्धतीने जनावरांचे संगोपन करणे. यामध्ये मोकळ्या जागेत कुंपण करून जनावरांना बांधून न ठेवता मुक्त ठेवण्यात येते. या मुक्त संचार गोठ्यात वैरण, पाणी व स्वच्छ हवा २४ तास पुरवली जाते. मुक्त संचार गोठ्याचे फायदे काय आहेत? याविषयी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहुया.

मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे काय आहेत ?

शेण उचलावे लागत नाही. 

जनावरांना फिरण्याचे स्वातंत्र्य असल्याने पाय व खुरांचे आजार होत नाहीत. 

कासदाह आजार होण्याचे प्रमाण अत्यल्प असते. 

जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो. 

पिण्यासाठी पाणी २४ तास उपलब्ध ठेवल्यास तहान लागल्यानंतर पाणी पिणे जनावरांना शक्य होते. याचा फायदा उत्पादन वाढीतून दिसून येतो. 

नैसर्गिक सर्व सुविधा मिळाल्यामुळे गायी, म्हशी आनंदी वातावरणात राहतात. त्यामुळे म्हशींमधील पान्हा सोडण्याची समस्या सुद्धा कमी होते. 

मुक्त संचार गोठ्यात कोंबड्या सोडल्यास त्या जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील गोचीड, कीटक खातात त्यामुळे जैवीक नियंत्रण होते. 

दुग्धव्यवसायात वेळ, मनुष्यबळ व पैशांची बचत करण्याच्या दृष्टीने पशुपालकांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSEDCL Electricity Reform: शेतकऱ्यांसाठी महावितरण स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Local Boyd Elections: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना सज्ज

Cotton Procurement: राज्यात कापूस खरेदी मर्यादा हेक्टरी ३० क्विंटल करावी

Eknath Shinde: 'अरे....कसं वागलं पाहिजं!' एकनाथ शिंदेंनी बांगर, गायकवाडांना सुनावलं, नेमकं काय झालं?

Cotton Mulching: कापूस पऱ्हाटीपासून खतनिर्मिती, मूल्यवर्धन

SCROLL FOR NEXT