Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : कोल्हापूर जिल्ह्यात ९८ टक्के लसीकरण

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगामुळे (Lumpy Skin Disease) जनावरांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुधवारअखेर (ता. २८) ७७ जनावरांचा मृत्यू (Animal Died Due To Lumpy Skin) झाला आहे. यामध्ये ५८ गाई व १९ बैलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७९ हजार पशुधनाला लस (Livestock Lumpy Vaccination) देण्यात आली आहे. हे प्रमाण ९८ टक्के आहे.

जिल्ह्यात १६२१ जनावरांना लम्पी स्कीनने गाठले आहे. यापैकी ७५६ जनावरे रोगमुक्त झाली आहेत. जिल्ह्यात २ लाख ७९ हजार पशुधनाला लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. रोगबाधित होण्याचा दर ०.५७ टक्के आहे. मृत्यू दर ४.७५ टक्के आहे. जनावरे रोगमुक्त होण्याचा दर ४६.४३ टक्के आहे.

या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या पशुंसाठी आणि इतर सर्व अटींचे पालन करणाऱ्या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे. लम्पी स्कीन हा जनावरांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरीदेखील वेळेत उपचार सुरू केल्यास तो नक्की बरा होतो. या आजारामुळे पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे पशुपालकांनी घाबरू नये.

तथापि, जनावरामध्ये लम्पी स्कीनची लक्षणे आढळल्यास शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती वेळेवर द्यावी व जनावरांवर वेळेत उपचार करून घ्यावेत. अधिक माहितीसाठी त्या-त्या तालुक्यांतील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय ०२३१-२६६२७८२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

SCROLL FOR NEXT