Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Agro Tourism Opportunity : कृषी पर्यटन ही संकल्पना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुजते आहे. त्यादृष्टीने आपल्या राज्यात सुवर्णसंधी असून, सर्वतोपरी अनुकूलता आहे.
Agri Tourism Festival
Agri Tourism FestivalAgrowon

Nashik News : कृषी पर्यटन ही संकल्पना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुजते आहे. त्यादृष्टीने आपल्या राज्यात सुवर्णसंधी असून, सर्वतोपरी अनुकूलता आहे. मात्र या व्यवसायाला रिसॉर्टचे स्वरूप न येता, ग्रामसंस्कृतीशी निगडित असलेला त्याचा मूळ गाभा टिकून राहावा, यासाठी त्याची मूलतत्त्वे जपणे आवश्यक आहे. याचा प्रत्यय बसवंत गार्डनमध्ये दिसून आल्याचे प्रतिपादन राज्य कृषी व सहकारी ग्रामीण महासंघाचे (मार्ट) अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी केले.

पिंपळगाव बसवंत येथील बसवंत गार्डनमध्ये कृषी पर्यटन महोत्सवांतर्गत आयोजित ‘कृषी पर्यटन आणि बदलती जीवनशैली’ या विषयावरील चर्चासत्र तसेच ‘बसवंत कृषी पर्यटन पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात शुक्रवारी (ता. १७) ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Agri Tourism Festival
Agrotourism Income : कृषी पर्यटनातून साधावी उत्पन्न वाढीची संधी

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नाशिक विभागाच्या पर्यटन अधिकारी यामिनी मुंडावरे, पुणेस्थित ‘सीबीआरटीआय’चे माजी विकास अधिकारी डॉ. धनंजय वाखले, ज्येष्ठ सनदी लेखापाल राजाराम बस्ते हे विशेष निमंत्रित होते.

ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात त्यातही प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब पिकांची शेती मोठ्या प्रमाणात होते. या परिसराची ओळख आता वाइन कॅपिटल म्हणूनही होते आहे. या अनुकूलतेचा शेतकऱ्यांनी कल्पकतेने लाभ घ्यावा. विविध सुविधांसह आपल्या शिवारात कृषी पर्यटन केंद्र उभारल्यास त्यांना उत्तम अर्थलाभ होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘ग्रीनझोन ॲग्रोकेम’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी केले.

Agri Tourism Festival
Agro Tourism Industry : कृषी पर्यटन उद्योगात महिलांचा सहभाग वाढता

या वेळी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. बी. तथा अण्णासाहेब पवार, ग्रीनझोनचे ॲग्रोकेमचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. भास्कर गायकवाड, ‘सीबीआरटीआय’चे माजी विकास अधिकारी डॉ. धनंजय वाखले आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कृषी पर्यटन पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले.

चंद्रशेखर भडसावळे (सगुणा बाग, जि. रायगड), मनोज हाडवळे (पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, जि. पुणे), पद्मा बाळासाहेब देवरे व अंजना केवळ देवरे (शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र, जि. नाशिक), चैतन्य कुलकर्णी (अगत्य अ‍ॅग्रो टुरिझम, जि. नगर), श्रीकांत वाघ (एस.एस. फार्म, चौगाव, ता. सटाणा, जि. नाशिक), आदित्य प्रभाकर सावे (सावे फार्म, जि. पालघर), प्रतिभाताई सानप (सृष्टी अ‍ॅग्रो टुरिझम, छत्रपती संभाजीनगर),

विजय देठे (राधाकुंज नेचर केअर कृषी पर्यटन केंद्र, जि. बुलडाणा), श्रीकांत चव्हाण (रानफुला अ‍ॅग्रो टुरिझम अ‍ॅन्ड अ‍ॅडव्हेंचर, जि. पुणे), अभिलाष संतोषकुमार नागला (नंदग्राम गोधाम, गौ आणि कृषी पर्यटन केंद्र अंजाळे, यावल, जि. जळगाव), हरिराम देवराम थविल (रानझोपडी अ‍ॅग्रो टुरिझम, जि. नाशिक), राजू भंडारकवठेकर (अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र, जि. सोलापूर) हे पुरस्कारांचे मानकरी ठरले.

याच कार्यक्रमात मिलांज आंबा महोत्सवांतर्गत आयोजित स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. चर्चासत्र तसेच बसवंत आंबा महोत्सवाला नागरिक, शेतकरी, पर्यटनप्रेमींचा प्रतिसाद लाभला. या वेळी ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’चे संचालक विजय पवार, सुहास कदम, महेश पाटील, संदीप सोनवणे तसेच राजेंद्र बागूल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. बसवंत गार्डनचे संदीप वाघ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रूपेश ठाकरे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com