Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Sugar Processing : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‍स‌ असोसिएशनकडून (डीएसटीए) आज (ता. १८) साखर उद्योग प्रक्रिया क्षेत्रातील तंत्रज्ञानावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon

Pune News : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‍स‌ असोसिएशनकडून (डीएसटीए) आज (ता. १८) साखर उद्योग प्रक्रिया क्षेत्रातील तंत्रज्ञानावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागात डीएसटीएच्या लालचंद हिराचंद सभागृहात होत असलेल्या या चर्चासत्राचा विषय ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज’ असा आहे.

Sugarcane
Sugar Industry : राज्य बँकेकडून साखर मूल्‍यांकनात १०० रुपयांची घट

उद्‌घाटन सोहळ्यास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी संचालक प्रा जी. डी. यादव व नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस. डी. बोखारे, हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स माजी व्यवस्थापकीय संचालक यशवंत घारपुरे, साखर तंत्रज्ञान सल्लागार एस. जी. आठवले, व्हीएसआयचे माजी सल्लागार एस. व्ही. बोरुडे, राज प्रोसेसेसचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पिसे (हीट अँड मास बॅलन्स केस स्टडी ऑफ डिस्टिलरी प्लँट) हे मार्गदर्शन करतील.

Sugarcane
Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

दुसऱ्या चर्चासत्रात इक्विनॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक पंडित, एमआयटीचे प्रा. डॉ. एस. व्ही. तारळकर, इक्विनॉक्सचे उपाध्यक्ष डॉ. संजीव बाचल तसेच पी. के. सलोनी, प्रशांत धनपावडे यांचे सादरीकरण होईल.

थर्मोडायनॅमिक्स कॅल्क्युलेशन्स सिमर्सचे चिरायू शाह व वरिष्ठ व्यवस्थापक विराज पवार यांचा शोधनिबंध सादर होईल. चर्चासत्रात सहभागासाठी www.dstaevents.in येथे नोंदणी करावी, असे आवाहन डीएसटीएचे उपाध्यक्ष एस. एस. शिरगावकर, एम. के. पटेल व एस. डी. बोखारे, अभियांत्रिकी समिती समन्वयक एस. डी. बोरुडे, सहसमन्वयक वा. र. आहेर, निमंत्रक बी. एच. श्रीकांत व कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com