Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

Crop Damage : बिजवडी (ता. माण) परिसरासह जाधववाडी, तोंडले येथे गुरुवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
Hailstorm
Hailstorm Agrowon

Satara News : बिजवडी (ता. माण) परिसरासह जाधववाडी, तोंडले येथे गुरुवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. मोठमोठ्या गारा पडल्याने जाधववाडी, बिजवडीतील डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले.

कोरेगाव परिसरात एक तास मुसळधार व गारांसह पाऊस झाला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजताही पुन्हा पावसाने हजेरी लावली. खटाव तालुक्यातील मायणी परिसरात पावसाने दमदार हजेरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

माण तालुक्यातील बिजवडी, जाधववाडी, तोंडले परिसराला दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. क्रॉप कव्हर टाकलेल्या बागेत गारांचा खच पडला होता. यात अनेक शेतकऱ्यांची झाडेही उन्मळून पडली, तर विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

Hailstorm
Hailstorm : गारपिटीने टरबूज शेतीचे प्रचंड नुकसान

या भागातील बहुतांश सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे टँकर सुरू आहेत. तरीही या भागातील शेतकऱ्यांनी धाडसाने विकतचे पाणी घालून बागांचे नियोजन केले आहे. काही बागांचे सेटिंग पूर्ण झाले आहे, तर काही बागांना फुलकळ्या निघत आहेत. वादळी वारा व गारांच्या पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. खटाव तालुक्यातील मायणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह येथे सुमारे पाऊण तास दमदार पावसाने हजेरी लावली. या

Hailstorm
Hailstorm Alert : नगर, नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा

पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. कोरेगाव शहर आणि परिसरात गुरुवारी दुपारी सव्वातीन ते सव्वाचार असा एक तास मुसळधार व गारांसह पाऊस झाला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजताही पुन्हा पावसाने हजेरी लावली. उन्हाळी नांगरट करून ठेवलेल्या शेतात पाऊस झाल्याने सऱ्या भरून वाहत होत्‍या. दरम्यान, रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. हा पाऊस रात्री नऊपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपात सुरूच होता.

दोन दिवसांपूर्वी सेटिंग झालेल्या डाळिंबाच्या बागेवर क्रॉप कव्हर टाकला होता. पाण्याची भीषण टंचाई असतानाही बाग धरली होती. फळांचे सेटिंगही चांगले झाले होते; परंतु गारांचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
- बबन भोसले, शेतकरी जाधववाडी
टंचाई परिस्थितीत विकतचे पाणी घालून डाळिंबाला बहर धरण्याचे धाडस केले होते. झाडांना नुकत्याच फुलकळ्या लागल्या होत्या. मात्र वादळी वारा व गारांच्या पावसामुळे फुलकळ्या तुटून पडल्या आहेत. वाऱ्यामुळे झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे.
-शंकर जाधव, शेतकरी जाधववाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com