Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : सातारा जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण ९८ टक्के

लम्पी स्कीन आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण ९८ टक्के पूर्ण झाल्‍याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

अॅग्रोवन वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ११३ गावांत लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव झाला आहे. त्यात एक हजार ७२९ गाय व २२६ बैल असे एकूण एक हजार ९५५ जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. (Vaccination) औषधोपचाराने ४१४ गाई व ४४ बैल असे ४९८ जनावरे नियमित बरी झाली आहेत.

लम्पी स्कीन आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण ९८ टक्के पूर्ण झाल्‍याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.फलटण, सातारा, खटाव, कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावळी व वाई या तालुक्यांत लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे.

लम्पी स्कीनच्या उपचारासाठी आवश्यक सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांत उपलब्ध आहेत. २० व्‍या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनाची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६ असून, केंद्र शासनाच्या

मार्गदर्शक सूचनांनुसार रविवारअखेर बाधित गाव व त्या गावाच्या पाच किलोमीटर परिघातील ७०० गावांमधील गोवर्गीय १ लाख ९६ हजार १८६ व अन्य अबाधित क्षेत्रातील गावांमधील गोवर्गीय १ लाख ४९ हजार ७३६ असे ३ लाख ४५ हजार ९२२ पशुधनाचे लसीकरण पूर्ण केले आहे.

लम्पी औषधोपचाराने बरा होत असल्याने लक्षणे आढळल्‍यास त्यांची माहिती शेतकऱ्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ यावर तत्काळ संपर्क साधावा.

जिल्ह्यामध्ये खासगी पशूवैद्यकीय सेवादाते यांचेमार्फतही लसीकरण करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून सर्व निरोगी पशूधनास लसीकरणाचे कामकाजे वेगाने केले जात असल्याचेही डॅा. परिहार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT