Lumpy Skin Disease  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी’मुळे जिल्ह्यात ९५ पशुधनाचा मृत्यू

Lumpy Vaccination : आठ लाख ४६ हजार ७४५ पशुधनापैकी ८ लाख २५ हजार ६७६ पशुधनाचे (९७ टक्के) लसीकरण झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात ‘लम्पीच्या स्कीन’च्या आजाराने अडीच हजारांहून अधिक गोरवर्गीय पशुधन बाधित झाले आहे. त्या पैकी ९५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आठ लाख ४६ हजार ७४५ पशुधनापैकी ८ लाख २५ हजार ६७६ पशुधनाचे (९७ टक्के) लसीकरण झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही मृत्युमुखी पडणाऱ्या पशुधनाच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.

‘‘जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ६८६ पशुधनाला ‘लम्पी’चा संसर्ग झाला आहे. त्यापैकी २ हजार १११ जनावरे बरी झाली आहेत. एप्रिलपासून आतापर्यंत ९५ जनावरे दगावली आहेत. त्यामध्ये २९ गाई, २२ बैल आणि ४३ वासरांचा समावेश आहे.

मृत झालेल्या एकूण पशुधनापैकी ८९ पशुधनाचे लसीकरण झाले होते’’, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

‘लम्पी’च्या प्रादुर्भावामुळे दुधाळ पशुधनाचे दूध घटते. बाधित जनावरांना ताप येणे, भूक मंदावणे आदी लक्षणे दिसून येतात. वासरांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. या आजारामुळे पशुधनाचा मृत्यू होत आहे. तसेच अनेक जनावरे अशक्त होत असल्याचे समोर आले आहे.

तातडीने उपचार करावेत

‘लम्पी स्कीन’ हा आजार टाळण्यासाठी गोठ्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण सातत्याने करणे गरजेचे आहे. तसेच पशुधनाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन जनावर आजारी वाटल्यास तातडीने त्यास विलग करून औषधोपचार करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baramati Milk Union Naming: ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध संघ’ असे नामकरण

US India Trade Deal: अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांवर परिणामाची भीती

Election Campaign: पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या निधनाचे प्रचारावर सावट

Farmer Success Story: भांगे- पाटील यांच्या हुरड्याची दिल्लीपर्यंत ओळख

Baramati Agro Sugar Factory: ऊस गाळपात बारामती अॅग्रो साखर कारखाना आघाडीवर

SCROLL FOR NEXT