Livestock market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : आळेफाटा गाईंच्या बाजारात ६० लाख रुपयांची उलाढाल

Cow Market : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या गाईंच्या बाजारात २०७ च्या वर गाईंची विक्री झाली. या बाजारात ६० लाखांच्यावर उलाढाल झाली.

Team Agrowon

Pune News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या गाईंच्या बाजारात २०७ च्या वर गाईंची विक्री झाली. या बाजारात ६० लाखांच्यावर उलाढाल झाली. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात दर गुरुवारी जिल्ह्यात सर्वात मोठा गाईंचा बाजार भरतो.

येथील बाजारात पारनेर, अकोले, पुणे, नाशिक, संगमनेर, ठाणे, अहमदनगर तसेच इतर ठिकाणाहून संकरित दुधाळ जातीच्या गाई विक्रीसाठी येतात. या आठवड्यात भरलेल्या बाजारात २२७ संकरित गाई विक्रीसाठी आल्या होत्या.

यामध्ये २५ हजारांपासून ते ७० हजार रुपयांपर्यंत विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक नबाजी गाडगे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रशांत महाबरे यांनी दिली.

दरम्यान, येथील गाई बाजारात या आठवड्यात दूध गवळी, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती. दुधाचे बाजारभाव उतरले असले तरी पावसाळा सुरू झाला आहे.

त्यामुळे गाईंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून पावसाळा सुरू झाला असल्याने किमतींत देखील वाढ झालेली आहे, अशी माहिती रूपेश कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, दिलीप सरमाळे, विजय थोरात, अमोल मोडवे, सिकंदर शेख, नन्नु शेख या व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात दबाव कायम, मका दरात मंदी, ढोवळी मिरची आवकेत चढ-उतार, शेपू दरात चढ-उतार, मोसंबी बाजारात नरमाई

Uddhav Thackeray: पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघता का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Shirala Farmers: शिराळा तालुक्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी

Power Shortage: अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे दुष्काळात तेरावा महिना

Loan Waiver List: धुळे जिल्ह्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

SCROLL FOR NEXT