Lumpy skin disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात २२ जनावरे ‘लम्पी स्कीन’ बाधित

Lumpy Skin Outbreak : गेल्या वर्षी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाला, तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून कऱ्हाड, फलटण, कोरेगाव व माण तालुक्यांत आजाराने बाधित २२ जनावरे आढळून आली. आजाराने डोके वर काढले असून काले (ता. कऱ्हाड) येथील कालवडीचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

गेल्या वर्षी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाला, तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही दिली होती. गेल्या काही दिवसांत लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.

कऱ्हाड तालुक्यात तीन गावांमधील १७ जनावरे, फलटण व माण तालुक्यात प्रत्येकी एक व कोरेगाव तालुक्यात तीन अशी २२ जनावरे बाधित आढळून आली आहेत. बाधित जनावरांच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व पशुसंवर्धनचे वैद्यकीय अधिकारी यांचे पथक तयार केले आहे.

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी बाधित जनावरे कळपात सोडू नये. जनावरांच्या गोठ्यात गोमाशा, डास यांचा शिरकाव होऊ नये, याची शेत‍कऱ्यांनी काळजी घ्यावी. लम्पी स्कीनसदृश लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा; मध्य महाराष्ट्रातही सरी हजेरी लावण्याचा अंदाज

Crop Damage Compensation Demands: पावसाअभावी बाधित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : आमदार सतीश चव्हाण

Rural Development: प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचविण्याचा ध्यास घेतलेले विलासराव!

Commercial Agriculture Argentina: अर्जेंटिनातील व्यावसायिक शेतीची वाटचाल

Patoda Farmer Friends: पाटोदा तालुक्यात २४ ‘शेतकरी मित्र’ निवडीसाठी आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT