Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ मुळे १०४ जनावरांचा मृत्यू

दोन हजार ३१५ जनावरे बाधीत : १०५० गावांत लसीकरण

टीम ॲग्रोवन

नांदेड : गाय वर्गातील जनावरांना लम्पी स्किनचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. आजपर्यंत या आजारामुळे १०४ चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजार ३१५ जनावरे या आजारामुळे बाधित झाले आहेत. लम्पी आजाराच्या प्रतिबंधासाठी एक हजार ५० गावात लसीकरण (Lumpy Skin Vaccination) मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी (Dr. Madhusudan Ratnaparkhi) यांनी दिली.

गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकूण १७९ बाधित गावात दोन हजार ३१५ गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

आजवर १०४ पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर १०५० गावांवर लक्ष दिले आहे. या गावात लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यःस्थितीत चार लाख १५ हजार ६३६ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

मृत पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या ३१ वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. रत्नपारखी यांनी केले.

दरम्यान लम्पीची बाधा वाढत असल्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. रब्बी हंगामात सध्या पेरणीची कामे सुरु असताना बैलांना या आजाराची बाधा झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामावर परिणाम होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT