
कोल्हापूर : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Dsease) प्रसार सुरूच आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत २८७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. आजाराच्या विळख्यात अडकलेल्या ५२७४ पशुधनापैकी ३५३६ पशुधन (Livestock) आजारमुक्त झाले आहे.
मरतुक झालेल्या ६५ गाईंच्या पशुपालकांना प्रत्येकी ३० हजार प्रमाणे १९ लाख ५० हजार, ३३ बैलांच्या मालकांना २५ हजार प्रमाणे ८ लाख २५ हजार आणि ७ वासरांसाठी मालकांना प्रत्येकी १६ हजार प्रमाणे १ लाख १२ हजार असे एकूण २८ लाख ८७ हजार रुपये पशुपालकांना वाटप करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती जिल्हा संवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी दिली.
हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रेंदाळ व रांगोळीमध्ये लम्पी स्कीनचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. या भागात जवळपास २०० जनावरांना लागण झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात ५७ जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन बाधित होऊन मृत्युमुखी पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.