Chana Wilt
Chana Wilt Agrowon
ॲग्रो गाईड

Chana Wilt : तुमच्या हरभऱ्यावर मर रोग आलाय का?

Team Agrowon

यंदाच्या रब्बीत उशीरा का होईना बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची लागवड झाली. हरभरा पीक सध्या रोपावस्थेत असून वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काही भागात या पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मर हा रोग फ्युजारियम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. मर रोगामुळे उत्पादनात १० ते १०० टक्क्यांपर्यंत घट येते. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया हा एकमेव खात्रीशिर उपाय आहे असे म्हणता येईल. प्रादुर्भाव जर थोड्या प्रमाणात असेल तर ट्रायकोडर्माची आळवणी करुन काही प्रमाणात या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. पण प्रभावीपणे नियंत्रण होईलच असे सांगता येत नाही कारण मर हा जमिनीतून पसरणारा बुरशीजन्य रोग असून याचा प्रादुर्भाव जमिनीत ५ ते १५ सेंमी खोलीपर्यंत असू शकतो. आळवणी केलेले द्रावण जमिनीत इतक्या खोलीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बिजप्रक्रिया न करता हरभऱ्याची पेरणी केलेली आहे त्याठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. मर रोगाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत याविषयी कडधान्य संशोधन योजना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे. डॉ. मनोहर इंगोले आणि डॉ. सुहास लांडे यांनी दिलेली माहिती पाहुया. 

मर रोगाची लक्षणे काय आहेत?

रोग पिकाच्या सर्वच वाढीच्या अवस्थेमध्ये आढळून येतो. या बुरशीचा रोपात प्रवेश झाल्यानंतर हळूहळू ही बुरशी झाडात वाढते व नंतर पाने पिवळसर पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने पिवळी पडून कोमेजतात. शेंडे मलूल होतात. झाडांना उपटून बघितल्यास झाडाच्या खोडाचा भाग ज्या ठिकाणी जमिनीचा संपर्क येतो त्याच्या थोड्या वर पासून जमिनीतील काही भाग बारीक झालेला आढळतो. फुलोऱ्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाड एकाएकी मरायला सुरुवात होते. शेताच्या एका विशिष्ट भागामध्ये असे बरेच वर्ष झाडे मलूल झालेली आढळतात. झाडाच्या मुळापासून उभा काप घेतल्यास त्या ठिकाणी काळ्या रंगाची उभी रेघ आढळून येते. 

नियंत्रणाचे उपाय काय आहेत? 

एकाच शेतात हरभऱ्याचे पीक सतत घेणे टाळावे. पिकाची फेरपालट करावी. रोगप्रतिकारक जातींमध्ये जाकी - ९२१८, पीकेव्ही काबुली - २, पीकेव्ही काबुली - ४, पीडीकेव्ही कांचन, पीडीकेव्ही कनक इत्यादी वाणांचा वापर करावा. 

पेरणीपूर्वी हरभऱ्याच्या बियाण्यास टेब्यूकोनॅझोल (५.४ % डब्ल्यू डब्ल्यू एफ एस) या बुरशीनाशकाची ४ मिली अधिक ४० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. किंवा प्रोकल्यास (५.६० %) अधिक संयुक्त बुरशीनाशक टेब्यूकोनॅझोल (१.४ टक्के डब्ल्यू डब्ल्यू एस) (०.१८ अधिक ०.४५) ३ मिली प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. 

मागील वर्षी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात तसेच पाणी साचणाऱ्या शेतात हरभऱ्याचे पीक घेणे टाळावे. रोगाचे अवशेष जाळून नष्ट करावेत. प्रादुर्भाव झालेली रोपे उपटून नष्ट करावीत. 

रोगाचा प्रादुर्भाव जर थोड्या प्रमाणात झाला असेल तर ट्रायकोडर्मा ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. या उपायाने काही प्रमाणात या रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT