Kharif Jowar Variety  Agrowon
ॲग्रो गाईड

Kharif Jowar Variety : धान्य, कडबा उत्पादनासाठी ज्वारीच्या कोणत्या वाणाची निवड कराल?

Kharif Jowar Cultivation : पावसाच्या अनियमितपणामुळे चाऱ्याची कमतरता तीव्रतेने जाणवते. अशा वेळी धान्य म्हणून आणि चाऱ्याची गरज भागविण्यासाठी ज्वारीची लागवड फायदेशिर ठरते.

Team Agrowon

Kharif Jowar : जागतिक पातळीवर आता कमी पावसात येणाऱ्या आणि पौष्टिक पिकांना महत्त्व दिले जात आहे. भरडधान्य वर्षामुळे लोकांना ज्वारी, बाजरीसह इतर भरडधान्याचे महत्त्व कळत आहे. त्यामुळे ज्वारीला वाढती मागणी आहे.

ज्वारी हे उष्ण तसेच अर्धशुष्क उष्ण कटीबंधीय प्रदेशातील एक महत्त्वाचे पीक आहे. खरीप ज्वारी ही मुख्यता कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. भारतात अन्नधान्य व चाऱ्यासाठी ज्वारीचा वापर (Jowar Use) होतो. पावसाच्या अनियमितपणामुळे चाऱ्याची कमतरता तीव्रतेने जाणवते.

अशा वेळी धान्य म्हणून आणि चाऱ्याची गरज भागविण्यासाठी ज्वारीची लागवड (Jowar Cultivation) फायदेशिर ठरते. त्यामुळे धान्य उत्पादन आणि चारा उत्पादनाच्या दृष्टीने अधिक चांगल्या वाणाची निवड करण गरजेचं आहे.

ज्वारीचे पी.व्ही.के. ८०१ म्हणजेच परभणी श्‍वेता या वाणाचे दाणे टपोरे व पांढरे शुभ्र आहेत. या वाणापासून हेक्‍टरी ३२-३५ क्विंटल धान्याचे व १०-१२ टन चाऱ्याचे उत्पन्न मिळते. ११५-१२० दिवसांत तयार होणारे हे वाण दाण्यावर येणाऱ्या काळ्या बुरशी रोगास सहनशील आहे.

ज्वारीचे दुसरे महत्वाचे वाण आहे पी. व्ही. के. ८०९. उंच वाढणाऱ्या या वाणापासून ३५-३६ क्विंटल दाणे, तर १२०-१२२ क्विंटल वाळलेला कडबा मिळतो. दाण्याचा रंग मोत्यासारखा चमकदार असून, हे वाण काळ्या बुरशी रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाला पक्वतेसाठी ११८ दिवस लागतात.

आता पाहुया ज्वारीचे संकरित वाण कोणकोणते आहेत ते ...

ज्वारीच्या सी.एस.एच-१४ या वाणापासून ४०-४५ क्विंटल धान्याचे, तर ८.५-९ टन कडब्याचे उत्पन्न मिळते. हे वाण १००-१०५ दिवसात तयार होते. पावसात पीक सापडल तरी या वाणाच्या ज्वारीचे दाणे विशेष काळे पडत नाहीत.

ज्वारीच दुसर महत्वाच संकरित वाण आहे सी.एस.एच.-१६ ः मध्यम ते भारी जमिनीसाठी अखिल भारतीय स्तरावर हे वाण प्रसारित झालं असून, हे वाण १०५-१०७ दिवसात पक्व होतं. या वाणाची उंची १९०-२०० सें.मी. असून धान्य उत्पादन ४०-४२ क्विंटल प्रतिहेक्‍टर तर कडबा उत्पादन ९ ते ९.५ टन प्रतिहेक्‍टर मिळते.

ज्वारीचे सीएसएच- २५ म्हणजेच परभणी साईनाथ हे वाण उंच वाढणारे आहे. हे वाण ११० दिवसांत पक्व होते. या वाणापासून प्रतिहेक्‍टरी ४३.३ क्विटल धान्य उत्पादन आणि १२०.७ क्विटल कडब्याचे उत्पादन मिळते. तसेच हे वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असल्याने खरीप हंगामासाठी उत्तम आहे.

ज्वारीचे एसपीएच १६३५ हे वाण खरीप हंगामात मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. हे वाण १०८ ते ११० दिवसात पक्व होतो. या वाणा पासून हेक्‍टरी ३८ ते ४० क्विंटल धान्याचे आणि ११८ ते १२० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. हे वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असून, धान्याची व भाकरीची प्रत उत्तम आहे.

-----------

स्त्रोत - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT