Kharif Intercropping : खरिपासाठी कोणत्या आंतरपीकाची निवड कराल?

Team Agrowon

कापूस + सोयाबीन

- भारी जमीन आणि ज्या ठिकाणी थोडा सखल भाग आहे. अशा भागात कापूस + सोयाबीन या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. आंतरपीक म्हणून सुद्धा हे पीक कापसामध्ये घेता येते.

Kharif Intercropping | Agrowon

सोयाबीन + तूर

- या पद्धतीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात आली आहे. सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळींचे प्रमाण हे ४:२ असे ठेवावे.

Kharif Intercropping | Agrowon

बाजरी + तूर

- कमी पावसाचा भाग, मध्यम जमिनी तसेच उशिरा पेरणीसाठी बाजरी + तूर (३:३, ४:२) या पीक पद्धतीने लागवड करावी.

Kharif Intercropping | Agrowon

कापूस + उडीद आंतरपीक

- आंतरपीक पद्धती हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम ते भारी जमिनीमध्ये शिफारस केलेली आहे. कापसाचे अमेरिकन संकरित जातीच्या लागवडीसाठी ९० × ९० सेंमी आणि सरळ वाण (देशी कपाशी) लागवडीसाठी ९० × ६० सेंमी अंतरावर कापसाच्या दोन ओळी टोकण करून मध्ये उडदाचे आंतरपीक घ्यावे.

Kharif Intercropping | Agrowon

मका + सोयाबीन आंतरपीक

- मक्याची पट्टा पद्धतीने (७५-४५ सेंमी) लागवड करताना दोन पट्ट्यांतील अंतरामध्ये (७५ सेंमी) सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात.

Kharif Intercropping | Agrowon

मका + मूग आंतरपीक

या आंतरपीक पद्धतीची शिफारस प्रामुख्याने मध्यम ते हलक्या जमिनीसाठी आहे.

Kharif Intercropping | Agrowon

कापूस + मूग आंतरपीक

मुगाची १ ओळ कापसाच्या २ ओळींतील अंतरामध्ये घेण्याची शिफारस आहे.

Kharif Intercropping | Agrowon
Prons | Agrowon
आणखी पाहा...