Salam Kisan Agrowon
ॲग्रो गाईड

Salam Kisan Bajara Cultivation : काय आहे बाजरी लागवडीचे तंत्र?

बाजरी हे अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. बाजरीमध्ये इतर तृणधान्याच्या तुलनेत जास्त ऊर्जा असते. बाजरीची खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवड केली जाते.

Team Agrowon

बाजरी हे अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. बाजरीमध्ये इतर तृणधान्याच्या तुलनेत  जास्त ऊर्जा असते. बाजरीची खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवड केली जाते. संरक्षित पाण्याची सोय असल्यास, खरीप हंगामातील बाजरीपेक्षा उन्हाळी बाजरीपासून जास्त उत्पादन मिळते. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी बाजरी पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.  सलाम किसान समुहाने बाजरी लागवडीविषयी  दिलेली माहिती पाहुया. 

जमिनीची मशागत

जमीन चांगली नांगरुन उन्हात तापू द्यावी. २ ते ३ वेळा वखराच्या कुळवाच्या पाळ्या मारून घ्याव्या जेणे करून जमीन भुसभुशीत होईल. एकरी सिंगल सुपर फॉस्फेट - १ बॅग (५० किलो), जय संजीवनी - ५ किलो शेतात मिसळून पुन्हा एकदा वखराची पाळी मारून घ्यावी.

सुधारित जातीची निवड

पेरणीसाठी परभणी संपदा, समृद्धी ८२०३, शांती १९०८ यापैकी जातीची निवड करा  किंवा बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही बियाणे तुम्ही निवडू शकता. पेरणीसाठीसाठी सरासरी एकरी  १.५ किलो बियाणे वापरावे.

बिजप्रक्रिया

पेरणी पुर्वी बियाण्यावर मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करावी. त्यासाठी मिठाच्या पाण्यात बियाणे मिसळून पाण्यावर तरंगणारे पोकळ बियाणे आणि कचरा काढून टाकावा. तळाशी राहिलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे. मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर ह्युमिक जेल  - ५० ग्रॅम आणि  व्ही-कार्बो ५० ग्रॅम चोळून बियाणे पाच तास सावलीत वाळवून मगच पेरणी करावी. 

पेरणीचा हंगाम

खरीप हंगामासाठी जून ते जूलै महिन्यात बाजरी पिकाची पेरणी करावी. उन्हाळी हंगामात पेरणी करायची असेल तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यात बाजरी पेरणी करावी. दोन सरीमधील अंतर १८ ते २४ इंच ठेवावे आणि दोन रोपांमधील अंतर ४ ते ५ इंच ठेवावे.  पेरणी १ इंच खोलीपर्यंत होईल याची काळजी घ्यावी.   

खत व्यवस्थापन

खताची पहिली मात्रा - पेरणी सोबत खताची पहिली मात्रा द्यावी. त्यासाठी एकरी २०:२०:০০:१३ - १ बॅग (५० किलो), हाय पॉवर - १० किलो, शक्ति गोल्ड - १० किलो वापरावे. 

खताची दुसरी मात्रा - पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसात दुसरी खताची मात्रा देताना युरिया एकरी ३० किलो द्यावा.  

बाजरीसाठी आवश्यक फवारण्या

पहिली फवारणी - पेरणी पासून १८ ते २० दिवसांनी  पहिली फवारणी करावी. त्यासाठी ह्युमिक जेल - २५ ग्रॅम, चॅलेंजर – ५ मिली, व्ही-ठोको - २० ग्रॅम  प्रति १५ लिटर पंपातून फवारावे.  प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर हे स्टिक  १० मिली प्रति पंप वापरावे.  गरज भासल्यास पिकाच्या अवस्थे नुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

दुसरी फवारणी - खताची दुसरी मात्रा दिल्यानंतर दोन दिवसांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीसाठी ह्युमिक जेल - २५ ग्रॅम, वरद चमत्कार- ५ मिली, व्ही-जजमेंट - २० मिली, व्ही-प्राईड - १० ग्रॅम  प्रती १५ लिटर पंपातून फवारावे. या द्रावणात १० मिली पॉवर सेव्हर हे स्टिकर मिसळूनच फवारणी करावी. 

तिसरी फवारणी- तिसरी फवारणी कणसात दाणे भरताना करावी. त्यासाठी अमिनो जेल - २५ ग्रॅम, व्ही-कॉम्बो - २५ ग्रॅम, व्ही-टोन - २५ मिली १५ लिटर पंपाने कारावी.  या द्रावणात १० मिली पॉवर सेव्हर हे स्टिकर मिसळूनच फवारणी करावी. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार तिसरी फवारणी पुन्हा करावी.

काढणी

जेव्हा पीक परिपक्व होते, तेव्हा पाने पिवळसर होतात झाड वाळते. कणसातील दाणे कडक आणि टणक होतात. दाण्यातील ओलावा १२ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास साठवणूक करावी. 

( सलाम किसान हे एक सुपर अॅप आहे. वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचा बाजारभाव मंदीतच; कांद्याचे भाव दबावातच, लसूण दरात सुधारणा, मोसंबीचे दर कमीच, तर ज्वारीचे दर स्थिर

Monsoon Rain: दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील एक लाख जनावरांना लाळ्या खुरकतची लस लसीकरण

Land On Rent : शेती आतबट्ट्यात; शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेपट्ट्यावर

Khandesh water Storage : खानदेशात जलसाठा मुबलक

SCROLL FOR NEXT