Team Agrowon
रोपे तयार करण्यासाठी २ x१ मी. आकाराच्या गादी वाफ्यावर ४ ते ५ सेंमी अंतरावर बी पेरावे. बी जास्त खोल पेरू नये. साधारणतः १ सेंमी खोल बी पेरावे. बी विरळ पेरावे. पेरणीनंतर शेणखत व माती मिश्रणाने बी झाकावे. वाफ्यात झारीने पाणी द्यावे.
सकस व भारी जमिनीमध्ये झेंडू पिकाची वाढ चांगली होत असली तरी उत्पादन कमी मिळते. त्यामुळे झेंडू लागवडीसाठी हलक्या ते मध्यम जमिनी पोषक असतात.
फुले मध्यम हवामानात चांगली वाढतात. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाच्या वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. जास्त पाऊस या पिकास हानिकारक ठरतो.
दर्जेदार झेंडू फुलांच्या उत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची मध्यम जमीन लागवडीसाठी निवडावी. सपाट वाफा, सरी वरंबा आणि रुंद सरी किंवा गादीवाफ्यावर लागवड केली जाते.
बाजारपेठेचा अभ्यास करून निवडलेल्या जातीची हंगामनिहाय लागवड करावी.
झेंडू पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येत असले तरी उत्तम प्रतीच्या दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची मध्यम जमीन लागवडीसाठी निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
साधारणतः हेक्टरी १ ते १.५ किलो बी लागते. संकरित जातीचे बी महाग असते. त्यामुळे त्यांची काळजीपूर्वक पेरणी करावी. संकरित बी पेरणीसाठी प्लॅस्टिक ट्रे व कोकोपिटचा वापर करावा.