Dairy Business Update : दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या प्रमाणावर प्रतिलिटर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रमाण अवलंबून असते. म्हणून दुधातील प्रत्येक घटकाचे प्रमाण हे महत्त्वपूर्ण आहे.
दुधाचे दर दुधातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण व स्निग्धपदार्थविरहित धृतांश यावर ठरवले जातात. कोणत्याही दुधात आढळून येणारे घटक हे तेच असतात मात्र त्यांचे प्रमाण कमी-जास्त असते.
दुधातील घटक बदलास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्याकरिता या घटकांच्या प्रमाणावर परिणाम करणारे घटक यांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
जनावरांचा प्रकार - निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक हा आढळतोच. उदा. गाय, म्हैस, शेळी इ.
जनावरांची जात - एकाच प्रकारच्या जनावरांच्या अनेक जाती आढळतात. उदारणार्थ होलस्टीयन फ्रिजीयन आणि जर्सी गाय या दोन्ही गायीच्या दुधाच्या घटकात फरक दिसून येतो.
गाय विल्यानंतर दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळापासून ठराविक वेळेपर्यंत म्हणजे तीन महिन्यापर्यंत दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण वाढत जाऊन पुढे हळू-हळू कमी होते. पहिल्या वेतापासून तिसऱ्या वेतापर्यंत दुधासोबत व स्निग्धांशांच प्रमाणही थोडे थोडे वाढते. नंतर ते स्थिर राहून कमी होत जाते.
एकाच जातीच्या गायीना सारखेच खाद्य दिले व व्यवस्थापनदेखील सारखेच असले, तरीदेखील त्यांचे एकूण दूध उत्पादन व दुग्धघटकांमध्ये फरक हा असतोच. काहीवेळेस हा फरक आनुवंशिक कारणामुळे असू शकतो.
दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण उन्हाळ्यात थोडे कमी आणि हिवाळ्यात थोडे अधिक असते. हाच फरक दूध उत्पादनात देखील आढळतो.
दूध काढण्याच्या वेळांमधील अंतर १२ तासांपेक्षा अधिक अंतर असेल, तर जास्त वेळानंतर काढलेल्या दुधाचे प्रमाण अधिक पण स्निग्धांशांचे प्रमाण कमी राहील.
गायीच्या एकाच वेळेच्या दोहनाच्या सुरवातीच्या धारांमध्ये स्निग्धांश कमी, तर शेवटच्या धारांमध्ये स्निग्धांश बराच अधिक असतो.
विण्याच्या काळात गाय धष्टपुष्ट असून अंगावर चरबी अधिक असेल, तर अशा गायीमध्ये सुरवातीच्या काळात दुधातील स्निग्धांश अधिक राहून, काही दिवस तो स्थिर राहून कमी झालेला दिसून येतो.
जनावरांचा आहार संतुलित नसल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादनावर आणि दुधातील घटकांवर परिणाम झालेला दिसून येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.