Nursery Scheme Agrowon
ॲग्रो गाईड

Nursery : रोपवाटिका तयार करताना काय काळजी घ्यावी?

रोपवाटिकेची योग्य काळजी न घेतल्यास रोपे कुमकुवत आणि रोगट होतात. अशा रोपांमुळे उत्पादनात घट होते आणि खर्चही वाढतो.

Team Agrowon

भाजीपाला पिके (Vegetable Crop) ही हंगामी स्वरूपाची असतात. अनेक रोग व किडींना ते लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत बळी पडत असतात. रोपवाटिकेची योग्य काळजी न घेतल्यास रोपे कुमकुवत आणि रोगट होतात. अशा रोपांमुळे उत्पादनात घट होते आणि खर्चही वाढतो. भाजीपाला पिकापैकी पालेभाज्या, गाजर, मुळा, भेंडी, घेवडा इ. बी कायम जागी लावून लागवड करतात, तर टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा यांसारख्या भाजीपाला पिकांची प्रथम रोपे तयार करून नंतर कायम जागी लावतात. रोपे तयार करण्याचे सुद्धा एक खास तंत्र आहे. रोपवाटीका तयार करताना काय काळजी घ्यावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली पाहिती पुढीलप्रमाणे.

रोपे कशी तयार करावीत ?

रोपवाटिकेकरिता हराळी, लव्हाळा किंवा इतर तण असलेली जमीन वापरू नये. 

योग्य जमीन निवडल्या नंतर त्यात गुंठ्याला १ गाडी चांगले कुजलेले शेणखत टाकावे. २० ते २५ सें. मी. खोलीपर्यंत नांगारणी करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 

जमीन भुसभुशीत केल्यानंतर ३ मी. लांब, १ मी रुंद व १५ ते २० से. मी. उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. 

भाजीपाल्याचे शुद्ध आणि जातिवंत बी वापरणे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. 

बियाणे चांगले नसेल तर भाजीपाल्याच्या लागवडीत इतर बाबीवर केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता असते. 

संकरित बियाण्याचे दर जास्त असल्याने बी टाकताना चांगली काळजी घ्यावी. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर दीड सें. मी. खोलीच्या हलक्या हाताने रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे व हळुवार मातीने झाकावे. दोन ओळींतले अंतर ६ सें. मी. ठेवावे. 

उन्हाळी हंगामात जमिनीचा वरचा थर कडक होऊ नये म्हणून, तसेच हिवाळ्यात आर्द्रतेत वाढ करण्यासाठी वाफ्यावर पाचट, भात, गहू पिकाचे तूस हलके पसरावे व १० ते २० टक्के मोड दिसू लागल्यावर काढावे. 

बियांच्या पेरणीनंतर गादी वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे. बियांची पेरणी झाल्यापासून बी रुजणे, मोड येणे आणि पाने येणे या क्रिया अनुकूल वातावरण असताना पिकानुसार ६ ते ८ दिवसांत होतात. 

रोपांची काळजी 

तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास ७५ टक्के नायलॉन नेट किंवा पांढरे कापड बांबूच्या साह्याने किंवा लोखंडी गज वापरून गादी वाफ्यावर दोन मी. उंचीपर्यंत ठेवून पिंजरा तयार करावा. यामध्ये रोपांची वाढ चांगली होते. तसेच रोपांचे फुलकिडे, पांढरी माशी यांसारख्या किडीपासून संरक्षण होते व विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत नाही. 

साधारणपणे रोपे ३-४ पानांवर असताना दोन ओळींतले तण हाताने काढावे. रोपे ३ -४ पानांवर असताना  मिश्र खते प्रति वाफ्यास २० ते  २५ ग्रॅम दोन ओळींमध्ये काकरी पडून द्यावी.  

रोपे लागवडीपूर्वी

हंगामानुसार व भाजीपाला पिकानुसार रोपे ४ ते ६ आठवड्यांत लागवडी योग्य होतात. 

रोपांचे स्थलांतर करण्यापूर्वी एक आठवडा आधीपासून पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी म्हणजे रोपे कणखर होऊन स्थलांतरानंतर दगावणार नाहीत. 

स्थलांतर करण्यापूर्वी २४ तास आधी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे, म्हणजे रोप उपटताना मुळाला फारशी इजा होणार नाही. रोपांचे स्थलांतर नेहमी संध्याकाळच्या वेळेस किंवा ढगाळ वातावरणात करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान

Agricultural Export Opportunities: शेतकऱ्यांना निर्यात संधी उपलब्ध करून देणार: पणनमंत्री रावल

Gokul Election Voting: 'गोकुळ'साठी आज ३५ केंद्रांवर मतदान, चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार?

Soybean Arrival: बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली

Land Acquisition Rule: भूसंपादन नसल्यास टेंडरही नाही

SCROLL FOR NEXT