Grain Storage Agrowon
ॲग्रो गाईड

Grain Storage : धान्य साठवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल ?

साठवलेल्या धान्यावर सोंडकीडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इं. किडींचा प्राददुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते.

Team Agrowon


हंगाम संपल्यानंतर धान्य साठवणीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किंडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते. नवीन धान्याची एकाचवेळी आवक झाल्याने दर कमी होतात.

हे टाळण्यासाठी धान्य तीने ते चार महिने साठवण करुन अपेक्षित बाजारभाव असाताना बाजारात विकल्यास चांगला भाव मिळू शकतो.

साठवलेल्या धान्यावर सोंडकीडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इं. किडींचा प्राददुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते.

त्यामुळे धान्याला कीड लागण्याची कारणे आणि धान्य साठवणूक (Grain Storage) करताना काय काळजी घ्यावी? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

धान्याला कीड लागण्याची कारणे

धान्यातील कीटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या कक्षेतच क्रियाशील राहू शकतात. धान्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १० टक्के पेक्षा जास्त असल्यास किंडींचा प्रादुर्भांव होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते.

काही किटकांचे प्रौढ पिकांच्या पक्व अवस्थेतील दाण्यावर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळाल्यानंतर अळी बाहेर येते आणि धान्य खाण्यास सुरुवात करते. त्यामुळे धान्य चांगले वाळवून साठवावे. 

धान्य साठवणूक करताना घ्यायची काळजी

धान्य साठवण्यापुर्वी कडक उन्हात वाळवून घ्यावं. गोदामातील कीड नियंत्रणाकरिता धुरिजन्य कीटकनाशकांचा वापर करावा.  उघड्या धान्यावर कीडनाशके फवारु नयेत.

गोदामात असलेली बीळे सिंमेंटने बुजवून घ्यावीत जेणेकरुन उंदीर गोदामात पोहोचू शकणार नाहीत. 

धान्य साठवण्यासाठी नविन गोणपाट किंवा पोती वापरावीत. धान्य साठवण्यासाठी जुने पोत वापरत असाल तर पोते गरम पाण्यात १५ मिनीटे भिजवून नंतर सुकवून वापरावे. 

पावसाळ्यात धान्य हवाबंद जागी ठेवावे. उन्हाळ्यात धान्य मोकळी हवा लागेल अशा ठिकाणी ठेवावं.धान्याची पोती एका लाकडी फळीवर जमिनीपासून उंचावर आणि भिंतीपासून दूर ठेवावीत. 

धान्य साठवणूक करताना कडूनिंबाचा पाला, बियांची पावडर वापरु शकता.

धान्य साठवलेल्या ठिकाणी उंदीर येऊ नये यासाठी दरवाज्याखाली गॅल्व्हनाईज पत्रा बसवून घ्यावा. उंदीर तसंच पक्षांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Harvesting: जुन्नर परिसराला विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याचे आकर्षण!

Sugarcane Cultivation: आतापर्यंत आडसाली ऊसाची ६७ हजार हेक्टरवर लागवड

Natural Disaster Mangement: नियोजनात्मक चुका, त्रुटींमुळे नैसर्गिक आपत्ती

Sugarcane Price Protest: ऊस दर प्रश्नी माजलगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Agrowon Agri Expo: आधुनिक शेतीतल्या नव्या संधींसाठी ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

SCROLL FOR NEXT