What are the causes of fat loss in milk? Agrowon
ॲग्रो गाईड

Milk : दुधातील फॅट कमी होण्याची कारणे कोणती ?

दुधातील फॅट कमी लागण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.

Team Agrowon

महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात (Cow Milk) किमान फॅट ३.८; तर म्हशीच्या दुधात ६ फॅट (Fat) असणे आवश्‍यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते. दुधाची किंमत स्निग्धांश वर ठरवली जाते. पावसाळ्यात भरपुर प्रमाणात कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे दुधाळ जनावरांना खुप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये तंतुमय घटक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दुधातील फॅट कमी लागते. दुधातील फॅट कमी लागण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनूसार दुधातील फॅटवर पुढील घटकांचा परिणाम होतो.

दुधातील फॅट कमी लागण्याची कारणे


आनुवंशिकता किंवा जनावराची जात, जनावरांचा आहार, दूध काढण्याच्या वेळा, धार काढण्याची पद्धत, दुधाळ जनावरांतील आजार, दुधातील भेसळ तसेच जनावराचे वय इ. घटक दुधातील फॅट वर परिणाम करतात.

दुधातील फॅट चे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी काय कराल?
जनावरांच्या आहारात एकूण तंतुमय घटकांचे प्रमाण म्हणजेच कडबा किंवा वैरणीचे प्रमाण २८ ते ३१ टक्के असणे आवश्यक आहे. दुधाळ जनावरांना आहारातून एकूण ६५ ते ७५ टक्के कडब्याचे प्रमाण मिळाले पाहिजे. जेणेकरुन जनावराच्या रुमेनमधील फायबर मॅट म्हणजे तंतुमय जाळे तयार होण्यास मदत होते. त्यामुळे कोटी पोटातील तंतुमय घटकाचे विघटन होऊन दुधातील फॅटचे सातत्य टिकून राहते.
दूध उत्पादन क्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे आनुवंशिकता किंवा जनावराची जात कोणती आहे यावरही दुधातील फॅटचे प्रमाण ठरते.
वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा.
दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त १२ तासांचे अंतर असावे. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत असते. त्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढून घेण गरजेचं आहे.
दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे फॅटचे प्रमाण कमी होते. दुधात पाण्याची भेसळ केली असता, दुधातील घन घटकांचे प्रमाण कमी होते. तसेच, दुधाची भुकटी मिसळून भेसळ केली असता दूध घट्ट दिसते, पण फॅट कमी लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT