Vegetable Grafting Agrowon
ॲग्रो गाईड

Vegetable Grafting : भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत?

महाराष्ट्रामध्ये प्रथमच भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्रज्ञानाची सुरुवात या गुणवत्ता केंद्रामार्फत केली गेलेली आहे. भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्रज्ञानाचे नेमके फायदे काय आहेत ? याविषयी या प्रकल्पाचे प्रमुख यशवंत जगदाळे यांनी पुढील माहिती दिली आहे.

Team Agrowon

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये (KVK, Baramati) भाजीपाला रोपांची कलम तंत्रज्ञानाने (Vegetable Grafting) निर्मिती केली जाते. या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामधून उत्तम प्रतीची रोग व कीडविरहीत रोपे तयार करून शेतकऱ्यांना पुरविली जातात. रोपे तयार करताना नेदरलँड मधील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये प्रथमच भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्रज्ञानाची सुरुवात या गुणवत्ता केंद्रामार्फत केली गेलेली आहे. भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्रज्ञानाचे नेमके फायदे काय आहेत ? याविषयी या प्रकल्पाचे प्रमुख यशवंत जगदाळे यांनी पुढील माहिती दिली आहे.   

- कलम तंत्रज्ञान वापरून तयार केलेली रोपे मातीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगाला प्रतिकारक्षम असतात.- कलम केलेले रोप मातीतून येणाऱ्या सुत्रकृमींना बळी पडत नाही.- रोपांमध्ये जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते.- पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ होत असल्यामुळे रोपांना मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा अधिक होतो.- भाजीपाला पिकासाठी खतांची मात्रा व पाणी कमी लागते.- फळांचा आकार, उत्पादन व गुणवत्ता सुधारते.

शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत? रोपांच्या पूणर्लागवडीनंतर फक्त १ – २ % च  रोपांची मर आढळून आली.पांढऱ्या मुळ्यांची वाढ जास्त झाल्यामुळे रोपे लवकर वाढीस लागतात व उत्पादन लवकर चालू होते.भाजीपाला पिकावर बुरशीजन्य रोगांचा ०.५ – १ % च प्रादुर्भाव आढळून आला.वांगी व ढोबळी मिरची /e भाजीपाला पिकांचे उत्पादन ३० – ३५ % नी वाढले.पाण्याचा ताण असेल किंवा जास्त पाण्यामध्येही या रोपांची वाढ चांगली होते.रोपांची वाढ जोमदार असल्यामुळे एकरी रोपे २० – २५ % कमी लागतात.भाजीपाला उत्पादन घेताना किडनाशके व बुरशीनाशकावरील खर्च कमी झाला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT