Citrus Fruit
Citrus Fruit Agrowon
ॲग्रो गाईड

Citrus Greening : 'सिट्रस ग्रीनिंग’ बाबत हवी व्यापक जागृती

टीम ॲग्रोवन

मागील अनेक वर्षांपासून लिंबूवर्गीय फळ उत्पादकांना (Citrus Fruit Production) अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी फळगळ तर कधी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. सगळे ठीक राहिले तर योग्य दर न मिळणे अशा अनेक संकटावर मात करत संत्रा-मोसंबी उत्पादक (Orange-Mosmbi Producers) पुढील काळात तरी चांगले दिवस येतील, या उद्देशाने जुन्या बागेची काळजी घेत नवीन लागवड करीत आहेत.

तसे पाहिले तर लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांच्या संशोधन संस्था याबद्दल जागरूकता किंवा कार्यक्रमाद्वारे जागृती करीत आहेत, पण प्रत्यक्षात या रोगाची मूळ कारणे शोधून शेतकऱ्‍यांपर्यंत पोहोचवायचे कार्य कोणी करताना दिसत नाही. सिट्रस ग्रीनिंग हा भारतातच नाही तर जगभरामध्ये लिंबूवर्गीय फळ उत्पादकांना भेडसावणार प्रमुख रोग झाला आहे. भारतात अनेक वर्षांपासून या रोगांची लक्षणे दिसायला लागले आहेत.

परंतु प्रत्यक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या रोगाच्या परिणामाची माहिती नसल्यामुळे काही कृषी निविष्ठा विक्रेते व अन्य मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनावर त्यावरती प्रयोग करीत आहेत.

उदाहरणार्थ ः ही अन्न द्रव्याची कमतरता आहे, बुरशीचा रोग आहे, हे वापरा ते वापरा असे चुकीचे मार्ग दाखविल्यामुळे या रोगाचा प्रसार अजून झपाट्याने इतर बागेतील झाडांवर होत आहे. दरवर्षी शेकडो हेक्टर संत्रा, मोसंबी, लिंबू, किन्नो आदी फळबागा या रोगाने ग्रस्त होत आहेत.

खरे तर रोगग्रस्त फळ रोपवाटिका (नर्सरी) या रोगाचे प्रसाराचे मूळ आहे. कारण आपल्या भागातील नर्सरी या शास्त्रशुद्ध पद्धतीने कलमे बनवत नाहीत, कलमे घेण्यासाठी चांगले मातृवृक्ष कोणाकडेही उपलब्ध नाहीत तसेच रोगाच्या तपासण्या करण्यासाठी कोणती यंत्रणा उपलब्ध नाही.

त्यामुळे लाखो कलमे अशा रोपवाटिकेतून भारतभर विकल्या जात आहेत. अशा रोपांची लागवड केल्यानंतर बागेत काही वर्षांतच या रोगाची लक्षणे दिसायला लागतात. यावर सर्वांत मोठी उपाय योजना म्हणजे संत्रा, मोसंबी उत्पादक बागायतदारांमध्ये या रोगाबद्दल जागृती करणे आहे.

यासोबतच रोगग्रस्त बागांची तपासणी करून सिट्रस ग्रीनिंग प्रादुर्भाव झालेले झाड नष्ट करणे गरजेचे आहे. कोरोना मध्ये जशा तपासण्या झाल्या होत्या त्याच धर्तीवर सिट्रस ग्रीनिंगच्या तपासण्या व्हायला हव्यात तरच पुढील काळात संत्रा, मोसंबी बागा आपल्याला पाहावयास मिळतील.

- ओंकार दिग्रसकर, कंधार जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT