Greenhouse Technology
Greenhouse Technology Agrowon
ॲग्रो गाईड

Greenhouse Technology : हरितगृहातील तापमान नियंत्रण महत्त्वाचे...

Team Agrowon

हरितगृहाचा प्रकार (Greenhouse Type) भौगोलिक वातावरण, तांत्रिक आणि शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता यावर अवलंबून असतो. हरितगृहाचे वर्गीकरण हे प्रामुख्याने किंमत, आकार, आच्छादन प्रकार आणि पीक हंगामावर असते. तसेच आकार हा शेतकऱ्यांजवळ उपलब्ध असलेल्या जमिनीवरती अवलंबून असतो. ज्या वेळी हरितगृहाचा आराखडा तयार करत असतो त्यावेळी कायमस्वरूपी असणारा भार, पिकाचा भार, वाऱ्याचा भार विचारात घेतला जातो. हरितगृहासाठी लागणारे साहित्य म्हणजेच पाइप्स, आच्छादन कागद (Mulching Paper) हेदेखील त्या संरचनेवरती असणाऱ्या भारावरूनच ठरवले जाते.

प्रामुख्याने पिकांच्या वाढीसाठी १७ ते २७ अंश सेल्सिअस तापमान आणि ५० टक्के ते ७५ टक्के आर्द्रता आवश्यक असते. पिकांच्या योग्य वाढीसाठी ४०० ते ७०० नॅनोमीटर इतक्या प्रकाशाची गरज असते. काही पिके तापमान व आर्द्रतेला खूप संवेदनशील आहेत. त्यामुळे ती पिके पारंपरिक शेतीमध्ये घेणे फायद्याचे ठरत नाही. नियंत्रित वातावरणातील शेतीमध्ये पिकाला आवश्यक असणारे वातावरणातील घटक अनुकूल ठेवले जातात. त्यामुळे पिकांची भरघोस वाढ होते. उत्पन्न वाढण्यास मदत होते.

आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली

सध्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील प्रक्षेत्र संरचना अभियांत्रिकी विभागामध्ये हरितगृहातील सुधारित तंत्रज्ञानाबाबत संशोधन आणि विविध प्रयोग सुरू आहेत.

 तापमानातील चढ उतार, पाऊस, वारा आणि अपर्याप्त बाष्पोत्सर्जनाशी संबंधित इतर घटक, तसेच कीटकांमुळे होणारे पिकांचे नुकसान सध्या सुमारे १५ टक्के आहे. हे नुकसान हवामानानुसार वाढू शकते. पारंपारिक हरितगृहाद्वारे काही प्रमाणात या समस्यांवर मात करता येऊ शकते.

हवामानातील विसंगती आणि कीटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी पारंपारिक हरितगृहामध्ये स्थिर छत असते. तथापि, छताच्या आच्छादनामुळे अजूनही तोटे आहेत ज्यामुळे कधी कधी जास्त उष्णता आणि अपुरा प्रकाश (सकाळी) होतो. नवीन तंत्रज्ञानाने विकसित मागे घेता येण्याजोगे-छताचे हरितगृह हे सध्याच्या हरितगृह डिझाइनमधील सुधारित आवृत्ती आहे. हे नैसर्गिक बाह्य वातावरण आणि नियंत्रित हरितगृह वातावरण या दोन्हींचा लाभ एकत्रित करते जेणेकरून पिकांचा हंगाम वाढवता येतो, उत्पादन वाढते.

मागे घेता येण्याजोग्या छतावरील हरितगृहामध्ये एक छप्पर असते जे अंशतः किंवा पूर्णपणे उघडले आणि बंद केले जाऊ शकते. जेव्हा हवामान परिस्थिती रोपांच्या वाढीसाठी अनुकूल असते तेव्हा उत्पादक छप्पर उघडू शकतो आणि जेव्हा पिकांना संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा छप्पर बंद करता येते. छत उघडे असताना, या प्रकारचे हरितगृहातील झाडांना नैसर्गिक वातावरण मिळते.

या तंत्रज्ञानामध्ये हरितगृहाचे छत उघडणे, बाजूचे पडदे उघडणे किंवा आवश्यकतेनुसार ते बंद करणे या गोष्टी समाविष्ट होतात. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे वातावरण, जसे की तापमान, आर्द्रता, प्रकाशाची तीव्रता, हवेचा प्रसार हे घटक नैसगिकरीत्या नियंत्रित केले जातात. त्यामुळे उपकरणांवर येणारा खर्च कमी करता येतो.

हरितगृहामधील स्वयंचलित प्रणाली

 हरितगृहामध्ये अंतर्गत वातावरण पिकांच्या वाढीसाठी अनुकूल केले जाते. पण ते पाहिजे तसे ठेवण्यासाठी स्वयंचलित प्रणाली किंवा यंत्रांचा वापर करावा लागतो. स्वयंचलित प्रणाली किंवा यंत्रे मोठमोठ्या हरितगृहांसाठी योग्य आहेत. पण ते आपण लहान हरितगृहासाठी वापरू शकत नाही, कारण त्याची किंमत व देखभाल खर्च जास्त आहे.

 मोठमोठ्या हरितगृहामध्ये काम करण्यासाठी जास्त मजुरांची आवश्यकता असते. पण जर आधुनिक उपकरणे व यंत्रे वापरली तर मजूरखर्चामध्ये बचत होते व कमी कालावधीमध्ये जास्त काम होते.

 हरितगृहामध्ये पंखे, प्रकाशाची उपकरणे, कुलिंग उपकरणे, हीटिंग उपकरणे यांसारखी यंत्रे वापरली जातात. यांच्यामुळे अंतर्गत वातावरण अनुकूल ठेवले जाते. तसेच देखभालीची गरज असते.

हरितगृहाचे छत उघडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. त्या पद्धती म्हणजेच पूर्णपणे छत उघडणे, एका ठराविक जागेवरती छताचे कापड गोळा करणे, तसेच कापड फोल्ड करून ते एका किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करणे. या सगळ्या पद्धती स्वयंचलितरीत्या किंवा यांत्रिकरीत्या चालवल्या जातात. त्यामुळे मजूरखर्चात बचत होते. अनुकूल वातावरण नैसर्गिकरीत्या तयार होते.

- डॉ. संदीप जैन,

८५५४८७५३६७

(विभागप्रमुख, प्रक्षेत्र संरचना अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT