Agriculture Inputs
Agriculture Inputs Agrowon
ॲग्रो गाईड

Agriculture Inputs : ‘सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड’ शेती निविष्ठा उत्पादनातील एक विश्‍वासाचं नाव

टीम ॲग्रोवन

पीक संरक्षण (Crop Protection) आणि विशेष रसायनांचे उत्पादन (Chemical Production) आणि पुरवठा जागतिक स्तरावर करून शेतीची उत्पादकता (Agriculture Productivity) इष्टतम करण्यासाठी नवनवीन आणि किफायतशीर उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली जात आहेत. शेती आणि शेतकरी विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या पाच वर्षांपासून ‘सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड’ची वाटचाल सुरू आहे. महत्त्वाच्या दर्जेदार शेती निविष्ठा उत्पादनामुळे (Agriculture Inputs Production) ‘सक्सेस बीज’ कंपनी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

...हे आहे नावीन्य

कंपनीचे नाविन्य हे संशोधन आणि विकास उपक्रमांचे उद्दिष्ट बाजारातील ट्रेंड आणि वैज्ञानिक कल्पनांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीरीत्या नवकल्पनांमध्ये त्वरीत रूपांतरित करणे आहे. त्यामुळे अतिरिक्त बाजार संधींचा वापर करणे कंपनीला सहज शक्य होते आहे.

...ही आहेत कंपनीची तत्त्वे

बाजार, विज्ञान आणि समाजातील बदलांमुळे उद्‌भवणारे फायदे कंपनी शोधते, ते व्हॅलूअरसाठी संधी म्हणून वापरतात. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला आकार देण्यासाठी अग्रगण्य स्थितीचा वापर करतात. नवीन व्यवसाय संधी ओळखतात आणि एकात्मिक संशोधनातून उद्‌भवणारे समन्वयात्मक प्रभाव वापरतात. ग्राहकांसाठी उत्पादने आणि सेवा विकसित आणि उपलब्ध करतात. त्यामुळे ग्राहक आणि कंपनी या दोन्हींसाठी मूल्य जोडणेे शक्य होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

...हा आहे कंपनीचा दृष्टिकोन

आत्मनिर्भर, कष्टकरी, स्वतंत्र, अभिमानी हे शेतकऱ्यांचे वर्णन करणारे शब्द भारतीय भावनेतून आले आहेत. अन्नाचा स्रोत असणारा शेतकरी ही भारताची पार्श्वभूमी आहे. ज्यामुळे देश आणि जगाचा बराचसा भाग निरोगी आहे. त्यामुळे सक्सेस बीज सायन्स प्रा.लि. भारतातील शेतकऱ्यांना त्यांची कामे अधिक प्रभावीपणे, कार्यक्षमतेने आणि अधिक फायदेशीरपणे करण्यासाठी वचनबद्ध आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील शेतकरी आणि अगदी काही अंतरावर असलेल्या शेजारचा शेतकरी यापेक्षा प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी आहे. हे लक्षात आल्यानंतर कंपनी सुरू केली गेली.

शेतकऱ्यांच्या गरजांशी जुळणारी रसायने

शेतकऱ्यांची स्थिती, त्यांची उद्दिष्टे, त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी आवश्यक उत्पादने तयार करून चाचणी केल्यानंतर बाजारात आणली जात असल्याने ते आपल्या वातावरणात कार्य करण्यासाठी सिद्ध झाले आहे. पिकांच्या विकासास समर्थन देण्यासाठी तसेच पिकांची कीटक आणि बुरशीमुक्त वाढ सुनिश्‍चात करण्यासाठी, कंपनी शेतकऱ्यांच्या गरजांशी जुळणारी रसायने तयार करते. अशा वेळी जेव्हा भारतीय मूल्ये पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहेत. भारतीय शेतकऱ्याचे मूल्य तितकेच महत्त्वाचे आहे, ही वस्तुस्थिती अतिशय गांभीर्याने घेतल्याचा दावा कंपनीने केला असून, सर्व मिळून हा बदल घडवून आणण्याचे आवाहन कंपनी करते.

१५७ उत्पादने बाजारात

गुजरातमधील नामांकित केमिकल कंपनीशी टाय अपनंतर पेस्टिसाइड्‌स निर्मिती सुरु केली. त्यानंतर वॉटर सोल्युबल, मायक्रोन्युट्रिअंट्‌स, ऑर्गेनिक निविष्ठांच्या उत्पादन घेण्याकडे वळले. आजघडीला जवळपास १५७ उत्पादने त्यांनी बाजारात आणली आहेत. त्यांच्या ट्रान्स्फार्मर, आउट ऑफ, अलास्का, स्पार्टन, वन स्ट्रोक या उत्पादनांसह सर्वच उत्पादनांना शेतकऱ्यांची मोठी पसंती मिळते आहे.

शेतीतील प्रश्‍नांमुळेच वळले कृषी शिक्षणाकडे

शेतकरी कुटुंबात जन्मलेले अमोल मवाळ यांच्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित जवळपास १२ एकर शेती. हंगामी बागायती असलेल्या या शेतीत त्यांचे वडील राबत असतानाच त्यांना शेतकऱ्यांच्या नेमक्‍या गरजांची, त्यांच्या अडचणीची माहिती मिळत गेली. त्यातून ते कृषिशास्त्र पदवी व त्यानंतर पदव्युत्तर पदवी घेण्याकडे वळले. त्यांचे लहान बंधू शिवराज मवाळ यांनी बी.फार्म.ची पदवी घेतलेली आहे. सद्यःस्थितीत सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मार्केटिंग इन्चार्ज म्हणून काम पाहत आहेत.

उत्पादनाच्या वापरानंतरच्या परिणामाचीही ठेवतात नोंद

अमोल मवाळ यांची सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आता आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांत विस्तारली आहे. शेतकरी कुटुंबात जन्म व उद्योगाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या अमोल मवाळ यांचे परिश्रम कंपनी विस्तारात महत्त्वाचे आहेत. केवळ प्रॉडक्‍ट उत्पादित करण्यापुरते मर्यादित न राहता, त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन सांगितले जातात. प्रॉडक्‍टची माहिती देऊन त्यांच्या प्रत्यक्ष वापराचे फायदे नोंदवून घेण्याचे काम कंपनीच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. त्यामुळे उत्पादनाची परिणामकारकता व गरज या दोन्हींचा मेळ साधणे शक्य होत असल्याचे श्री. मवाळ म्हणाले.

शेतकऱ्यांच्या समाधानावर विशेष ध्यान

आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून पीक व जमीन या दोहोंचीही काळजी कशी घेतली जाईल, याचाही विचार केला जात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे समाधान होईल याची प्राधान्याने खबरदारी घेण्याचे काम सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मिशनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी काम करताना संशोधन आणि सुधारणेला वाव देत शेतकऱ्यांना दर्जदार निविष्ठांचा पुरवठा व यशस्वी संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विविध पिकांसाठी आवश्यकतेनुसार परिणामकारक व गुणवत्तापूर्ण निविष्ठा उत्पादनाला प्राधान्य देते. प्रत्येक भागातील शेती व पिकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. परंतु संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साथीतून या सर्व समस्यांवर मात करता येणे शक्‍य आहे, यावर आमचा विश्‍वास आहे.

अमोल डी. मवाळ, कार्यकारी संचालक,

सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे

९८२३७४७७५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT