Fertilizer Use Agrowon
ॲग्रो गाईड

Fertilizer Use : खतांचा वारेमाप वापर थांबवा ; अशी वाढवा खतांची कार्यक्षमता

Fertilizer Use Efficiency : पिकाला खते देताना माती परीक्षणाच्या आधारावर खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. याशिवाय खते वाया जाऊ नयेत म्हणून ती पिकाला देताना कोणती खबरदारी घ्यावी हेही माहिती असायला हवे.

Team Agrowon

Fertilizer Management : पिकाला खते देताना माती परीक्षणाच्या आधारावर खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. याशिवाय खते वाया जाऊ नयेत म्हणून ती पिकाला देताना कोणती खबरदारी घ्यावी हेही माहिती असायला हवे.

संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते. रासायनिक खतांद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र (युरिया), स्फुरद (सुपर फॉस्फेट), पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश), सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त (झिंक सल्फेट, आयर्न सल्फेट, बोरॅक्स) खतांचा पुरवठा केला जातो. पिकांना दिलेली खतमात्रा पिकांकडून पूर्णतः शोषली जात नाही.

पिके त्यातील काही अंश शोषून घेतात. त्यामुळे खते पिकाला पुर्णपने लागू पडत नाहीत. खते वाया जाऊ नयेत आणि त्यांचा वापर पुर्णपने करायचा असेल तर खते पिकाला योग्य प्रकारे दिली गेली पाहिजेत.

अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्यक्षमता

अन्नद्रव्ये--------कार्यक्षमता (टक्क्यांमध्ये)

नत्र---------------३० ते ५०

स्फुरद------------१५ ते २५

पालाश------------५० ते ६०

जस्त---------------२ ते ५

लोह----------------१ ते २

बोरॉन--..............-१ ते ५

खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय

जमिनीत पुरेसा ओलावा असताना खते द्यावीत.

खते जमिनीवर फेकू नयेत.पेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावीत.

खतमात्रा मुळांच्या सान्निध्यात द्याव्यात. आवरणयुक्त खते/ब्रिकेट्‌स/सुपर ग्रॅन्युलसचा वापर करावा.

निंबोळी पेंडीसोबत युरियाचा १ः५ प्रमाणात वापर करावा.

पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत खते विभागून द्यावीत.

सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा.

पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.

तृणधान्य पिकांसाठी (नत्र, स्फुरद, पालाश, गंधक) खतांचा ४:२:२:४ या प्रमाणात, तर कडधान्यासाठी १:२:१:१ या प्रमाणात वापर करावा.

माती परीक्षणावर आधारित शिफारशींनुसार खतांचा वापर करावा.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे करावा.

पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थांसोबतच कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखतासोबत करावा.

सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा. विविध रायझोबियम, पी.एस.बी., ॲझोटोबॅक्टर यासारख्या जिवाणू खतांचा वापर करावा. समस्यायुक्त, क्षारयुक्त व चोपण जमिनीत जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी यासारख्या भूसुधारक खतांचा वापर करावा. चुनखडीविरहित जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यासाठी फाइल वित्त विभागाकडे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

Girna River Water : पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा: ‘गिरणा’च्या पाण्यातून भूजल पुनर्भरणाचा नवा पर्याय!

Agricultural Advisory: हवामान बदलाच्या काळात कृषी सल्ला मिळणे आवश्यक : डॉ. संजय भावे

Water Conservation : दुष्काळी परिस्थितीशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज: पिण्याचे पाणी, चारा आणि जलसंधारणाला सर्वोच्च प्राधान्य!

Namo Shetkari Yojana: ‘नमो’च्या तीन हप्त्यांचे पैसे कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT