Soybean Processing Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Processing : प्रक्रिया करुनच वापरा सोयाबीन

सोयाबीनमध्ये पौष्टिक घटकांबरोबर पौष्टिक घटकही समाविष्ट आहेत. त्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन आरोग्यास हानी होऊ शकते. त्यामुळे प्रक्रिया करुनच सोयाबीनचा आहारात समावेश करावा.

Team Agrowon

सोयाबीन (Soybean) मध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे, मांस व मासे यांच्या तुलनेत दुप्पट, अंड्याच्या तिप्पट व दुधाच्या दहापट इतके आहे, त्यामुळे सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची (Processed Food Products) निर्मिती आणि विक्रीसाठी मोठा वाव आहे.  सोयाबीनमध्ये पौष्टिक घटकांबरोबर पौष्टिक घटकही समाविष्ट आहेत. त्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन आरोग्यास हानी होऊ शकते. त्यामुळे प्रक्रिया करुनच सोयाबीनचा आहारात समावेश करावा. 

सोयाबीनमधील अपौष्टिक घटक, जसे मॅलॅक्‍टोज, स्टॅचिओज, फायचीक आम्ल ओलीगोसॅकराईडस इ. घटकांमुळे सोयाबीनचे पचन सुलभरीत्या घडून येत नाही. शरीरात वायुविकार प्रबळ होतात.सोयाबीन प्रक्रियेविना आहारात वापरल्यास दीर्घ काळानंतर मूत्रपिंड, पचनक्रिया, यकृत, रक्तशर्करा इ. विकार उद्‌भवतात म्हणून प्रक्रिया करूनच सोयाबीनचा आहारात वापर करावा.

ब्लॅंचिंग प्रक्रिया

सोयाबीन स्वच्छ करून वाळवून गिरणीतून डाळ करून साल काढावी.

तीन लिटर पाणी उकळून त्यामध्ये एक किलो सोयाडाळ २५ मिनिटांपर्यंत उकळावी.

उकळत्या पाण्यातून सोयाडाळ काढून कडक उन्हामध्ये वाळवावी.

या सोयाडाळीचा उपयोग पीठ, भाज्या तयार करण्यासाठी करता येतो.

१ किलो सोयाडाळ आणि ९ किलो गहू या प्रमाणात चपातीसाठी वापरावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT