Solar Drayer Agrowon
ॲग्रो गाईड

प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी उपयुक्त सोलर टनेल ड्रायर

सोलर टनेल ड्रायरमध्ये हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

Team Agrowon

सोलर टनेल ड्रायरमध्ये हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार, ३ x ६ मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे.

२५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.

टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काॅँक्रीटचा बनविलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.

अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (२०० मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे.

सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा "ग्रीन हाउस इफेक्‍ट''मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.

वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.

ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.

या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ravikant Tupkar: 'ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीची लढाई'; रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, पण अन्नत्याग आंदोलनावर ठाम

Women Development Corporation: ‘माविम’मुळे जिल्ह्यातील २१ हजार महिला स्वावलंबी

Youth Inspiration: मोझरीच्या मातीतून घडला ‘लेफ्टनंट’

Women SHGs: महिला समूहांना एक हेक्टर पडीक जमीन देणार : बावनकुळे

Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SCROLL FOR NEXT