Sugarcane Agrowon
ॲग्रो गाईड

Sugar Mill : पावसाची विश्रांती साखर कारखान्यांच्या पथ्यावर

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात निरभ्र आकाश व ऊन असल्याने याचा सकारात्मक परिणाम ऊस तोडणीवर झाला आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात निरभ्र आकाश व ऊन असल्याने याचा सकारात्मक परिणाम ऊस तोडणीवर (Sugarcane Harvesting) झाला आहे. पावसाअभावी रखडलेली ऊसतोडणी वेगात सुरू झाली आहे. हंगाम सुरू केलेल्या बहुतांशी कारखान्याकडून रस्त्या कडेला असणाऱ्या उसाची तोड करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.

पाडव्याचा मुहूर्त साधत उर्वरित साखर कारखानदार गळीत हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. शुक्रवारी (ता. २१) अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानंतर शनिवारपासून जिल्ह्यात पूर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. पाऊस थांबल्या थांबल्या खडक ऊन पडत असल्याने जमिनी वाफसा स्थितीत लवकर येण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

याचा पहिला सकारात्मक परिणाम रखडलेल्या ऊस गळीत हंगामावर होणार आहे. चार दिवसांपासून सलग असणारे स्वच्छ हवामान ऊस तोडणी कामगारांसाठी स्वागतार्ह ठरले आहे. जे उसाचे प्लॉट पक्क्या रस्त्याच्या शेजारी आहेत जिथून वाहतुकीची गरज नाही अशा प्लॉटना कारखान्याकडून तोडणीसाठी प्राधान्य दिले जात आहे.

काही ठिकाणी अगदी शेवट शेवटी नंबर असणारा ऊस ही आता नाइलाजास्तव पहिल्यांदा तोडण्यात येत आहे. आणखी आठ दिवस सलग ऊन पडल्यास ऊस गळीत हंगामास नियमितपणे तोड पाळीप्रमाणे सुरुवात होईल, असे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. पावसामुळे रखडलेले ऊस गळीत हंगाम येत्या दोन दिवसात सुरू होऊन ऊस तोडणीस वेग येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT