Organic carbon Agrowon
ॲग्रो गाईड

Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा दर्जा महत्त्वाचा...

सेंद्रिय कर्बाचा दर्जा हा विषय अजूनही आपल्या शब्दकोषात नाही. कुजण्यास हलका, मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारा असा तीनही प्रकारचा कच्चा माल जमिनीत पडला पाहिजे. तो जमिनीबाहेर न कुजविता जमिनीतच कुजला पाहिजे,याचा नेमका अर्थ काय? हे समजावून घेतले पाहिजे. कुजविणाऱ्या जिवाणू सृष्टिपैकी जास्तीत जास्त प्रजातींना खाद्य उपलब्ध झाले पाहिजे.

प्रताप चिपळूणकर

जागतिक तापमान (Global Warming) वाढ कमी करावयाची असेल तर टिकाऊ सेंद्रिय कर्बाचे (Organic Carbon) प्रमाण जमिनीत वाढविणे गरजेचे आहे. हा भाग आजपर्यंत संपूर्ण अंधारात राहिल्याने शेतकरी वर्गाला याबाबत फारशी माहिती नाही. पारंपारिक पद्धतीत शेणखत (Dung Fertilizer), कंपोस्ट (Compost Fertilizer) याच खतांचा (Fertilizer)आजही शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.

शेणखत, कंपोस्ट हा संपून जाणाऱ्या गटातील सेंद्रिय कर्ब आहे. एका हंगामी (३ ते ४ महिने) पिकाअखेर त्यातील ८० ते ९० टक्के भाग संपून जातो. हरितक्रांती नंतर आपण पारंपारिक जुन्या जातीच्या तुलनेत उत्पादनात किती तरी जास्त घ्यावयास लागलो. पावसाळी हंगामी एकच पीक घेत होतो तोपर्यंत फारसा प्रश्न आला नाही. बागायतीची सोय झाल्यानंतर वार्षिक, बहुवार्षिक, २ ते ३ हंगामात पिके घेणे, अशा शेती पद्धती सुरू झाल्या. या वाढीव उत्पादनाचा आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा काही संबंध असतो याबाबत शेतकरी वर्गाचे प्रबोधन केले जात नाही. इथे ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, जितके जास्त उत्पादन तितका सेंद्रिय कर्बाचा जास्त वापर केला जातो. जितके जास्त काळ पिके घ्याल तितका जास्त सेंद्रिय कर्बाचा वापर केला जाऊन तो संपतो. हरीतक्रांतीनंतर आपण उत्पादन वाढविले मात्र सेंद्रिय कर्बाचा वापर कमी-कमी करत नेला. रासायनिक खतांचा वाढीव वापर हा सेंद्रिय खताला पर्याय होऊ शकत नाही.

१) सेंद्रिय कर्बाचा दर्जा हा विषय अजूनही आपल्या शब्दकोषात नाही. कुजण्यास हलका, मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारा असा तीनही प्रकारचा कच्चा माल जमिनीत पडला पाहिजे. तो जमिनीबाहेर न कुजविता जमिनीतच कुजला पाहिजे,याचा नेमका अर्थ काय? हे समजावून घेतले पाहिजे. कुजविणाऱ्या जिवाणू सृष्टिपैकी जास्तीत जास्त प्रजातींना खाद्य उपलब्ध झाले पाहिजे. कुजविणाऱ्या जिवाणू सृष्टीचे जैववैविध्य जितके जास्त, तितके जमिनीला फायदेशीर, कुजविणारी जिवाणू सृष्टी जमिनीला सुपीकता देते.

२) एखाद्या पिकाची कापणी झाल्यानंतर विना नांगरता जमिनी खालील अवशेष जसे वाढले तसेच कुजत ठेवले तर एकाच वर्षात जमिनीची सुपीकता भरून निघाली. उत्पादनात चांगलाच फरक पडला. जमिनीला आजवर जागेला कुजणे माहीत नव्हते ते काम झाले. एक मोठ्या प्रश्नातून सुटका झाली. परंतु यापुढे आणखी काही सुधारणेला वाव आहे का ? यावर चिंतन सुरू झाले.

३) फक्त पिकाचे अवशेष कुजविणे हे मोनो कल्चर (एकाच वनस्पती पासून कच्चा माल) झाले. यापेक्षा कुजणारा पदार्थ अनेक वनस्पतींपासून झाल्यास जास्त चांगले. मग वेगवेगळ्या प्रकारच्या बिया एकत्र करून विसकटणे हा पहिला विचार डोक्यात आला. अशा बियांचे मिश्रण करताना दुसरा विचार आला तो म्हणजे मिश्रणातील बी-बियाणे मानवाचे खाद्यातील नसावे. तिसरा विचार म्हणजे मिश्रण कमीत-कमी खर्चात झाले पाहिजे.

४) सर्व विचार केल्यानंतर रानात आपोआप उगणारे तणच यासाठी का वापरू नये, हा विचार जोर धरू लागला. मग उसाचे अगर लांब अंतरावरील पिकामध्ये पीक मोठे होईपर्यंत दोन पिकाच्या ओळीत तणांचा पट्टा वाढविण्याचा निर्णय घेतला. पीक मोठे होऊन ज्यावेळी मधील जागा व्यापू लागेल, त्यावेळी तणे तणनाशकानेच मारावयाची. तणे मोठी वाढलेली असतील तर झोपवून मारावयाची किंवा ब्रश कटरने कापून टाकायची. पुढे येणाऱ्या तणांच्या कोवळ्या फुटीवर योग्यवेळी तणनाशक मारायचे. पुढे एक नवीन शोधाचा संदर्भ मिळाला की, एकदलपासून मिळालेला कच्चा माल जास्त चांगला. लगेच रानात जाऊन राखलेल्या तणांचे निरीक्षण केले असता त्यात गवतवर्गीय तणांची संख्या जास्त होती, द्विदल कमी होती.याचा अर्थ निसर्गाने रानामध्ये केलेले तणांचे मिश्रण योग्य आहे. एखाद्या खराब झालेल्या शेतात (सेंद्रिय कर्ब कमी असणारे) सुरवातीला खुरटी तणे वाढतात. सेंद्रिय पदार्थ वाढेल तसे मोठ्या वाढणाऱ्या तणांचे प्रमाण आपोआप वाढत जाते. हा एक निसर्गाचा चमत्कार असून हा फरक पहाणे व अभ्यासणे मोठे मजेशीर काम आहे.

माझा ऊस शेतीतील अनुभव ः

मला आलेला एक अनुभव नमूद करण्यासारखा आहे. १९७०ला मी शेती करू लागलो त्या काळात उसाला रासायनिक खताचे हप्ते देत असताना ५० टक्के हप्ता तेल विरहित भुईमुगाचे पेंडीतून देण्याची प्रथा होती. त्याचवेळी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने सलग तीन वर्षे प्रयोग करून सिद्ध केले की, भुईमूग पेंड वापरणे खर्चिक आहे. इथे फक्त रासायनिक खतातून खत मात्रा दिल्या तर उत्पादनात काही फरक पडत नाही. पेंडीमुळे उत्पादन खर्च मात्र वाढतो. संशोधन केंद्राचे संशोधन लक्षात घेऊन मी पेंड वापरणे बंद केले. यासाठी वडिलांचा विरोध डावलला. काही वर्षे खतावरील खर्च कमी झाला. परंतु लवकरच उत्पादन पातळी घसरू लागली. शेतीचा किफायतशीरपणा कमी होऊन उत्पन्न ढासळू लागले. पुढे पेंडी वापरणे वेगाने बंद झाले.

पशुपालनातून गरजे इतके खत देणे शक्य नव्हते. तसेच सेंद्रिय कर्बाच्या महत्वाबाबत माझ्यासारखा कृषी पदवीधर अंधारात होता. २००५ साली महाराष्ट्रात प्रचंड महापूर येऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पारंपारिक मार्गाने पुढे जाणे शक्य नाही हे लक्षात आले. अपघाताने भू सूक्ष्मजीवशास्त्र वाचनाचा नाद लागला. त्याने पुढील वाटचालीचा मार्ग दाखवून परत स्थिरस्थावर केले. आज मी २००५ चा पूर आणि झालेले नुकसान यांचे आभार मानतो. वाईटातून चांगले घडते ते असे. याचसाठी संकटाचे नियोजन असावे.

निसर्गातील नत्राचे अस्तित्व ः

भू-सूक्ष्मजीवशास्त्राने पीक पोषणातील बारकावे शिकविले. पीक पोषणात नत्र हा सर्वात महत्त्वाचा घटक. त्यावर खूप सविस्तर अभ्यास करणे गरजेचे आहे. हवेत एकूण ७८ टक्के नत्र वायू आहे. नत्राचे दोन अणू एकत्र येऊन नत्र वायू तयार होतो. निसर्गात नत्राचे अस्तित्व कोठे कसे आहे ते सांगणारा एक संदर्भ उपलब्ध आहे.

घटक --- (१० ६ मे. टन) (-- म्हणजे १० वर ६ शून्ये)

१) हवा - ३,८०००००

२) जमिनीतील सजीव - ७७२

३) जिवंत - १२

४) मृत - ७६०

५) असेंद्रिय (जमीन) - १४०

६) जमिनीचा वरचा थर - १४,०००,०००

७) समुद्राचे पाणी - २०,०००

८) समुद्रातील प्राणी - ९०१

९) मृत - ९००

जिवंत - १

१०) असेंद्रिय (समुद्राचे पाणी) - १००

११) समुद्राचे तळातील गाळ - ४०००,०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT