Grape Farm Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Crop Management : वाढत्या तापमानामध्ये द्राक्ष बागेत करायच्या संभाव्य उपाययोजना

Grape Advisory : गेल्या आठवड्यातील तापमानाचा विचार करता, बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान जास्त प्रमाणात (३५ अंश सेल्सिअसपर्यंत) वाढलेले दिसेल, तर आर्द्रता सुद्धा तितक्याच प्रमाणात कमी झालेली आहे.

Team Agrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Grape Crop : गेल्या आठवड्यातील तापमानाचा विचार करता, बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान जास्त प्रमाणात (३५ अंश सेल्सिअसपर्यंत) वाढलेले दिसेल, तर आर्द्रता सुद्धा तितक्याच प्रमाणात कमी झालेली आहे.

या वेळी बागेत वाढीच्या विविध अवस्था दिसून येतील. या अवस्थांमधील बागेत पुढील आठवड्यात तापमानाचा परिणाम आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना याबाबत माहिती घेऊ...

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अ) लवकर छाटणी झालेल्या बागेतील व्यवस्थापन
साधारणतः जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळछाटणी झालेल्या बागेत या वेळी मणी सेटिंग होऊन द्राक्ष मण्यांचा आकार ८ ते १० मिमीपर्यंत झाला असावा. या वेळी वाढत असलेले तापमान मण्याच्या विकासाकरिता पोषक समजले जाईल. घडाचा विकास चांगल्या प्रकारे होण्याची दाट शक्यता असेल. परंतु वाढत्या तापमानाचा विचार करता द्राक्ष वेलीची असलेली कॅनॉपी आणि बागेत उपलब्ध असलेले पाणी या गोष्टींचा ताळमेळ बसविणे गरजेचे राहील.

दिवसाचे तापमान वाढत असल्यामुळे पानांद्वारे होणारे बाष्पीभवन देखील तितक्याच प्रमाणात वाढेल व त्यानुसार जमिनीतून पाण्याची गरज सुद्धा वाढेल. ज्या बागेत पाणी कमी आहे किंवा हलकी जमीन असलेल्या बागेत मातीच्या कणांची संख्या कमी असल्याकारणाने जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल. त्यामुळे उपलब्ध पाणी व वेलीची गरज यामधील समतोल बिघडू शकतो. अशा परिस्थितीत खालीलप्रमाणे उपाययोजना महत्त्वाच्या असतील...

१) बोदावर मल्चिंग करणे ः
- मल्चिंगमुळे ठिबकद्वारे दिलेले पाणी बोदामध्ये तसेच साठून राहील व बाष्पीभवन होणार नाही. यासोबत बोदामधील मुळीचा विकास चांगला होऊन पांढऱ्या मुळीची उत्पत्तीसुद्धा तितक्याच प्रमाणात होण्याची शक्यता जास्त राहील.


- बागेत पाणी देण्याचा वेळ महत्त्वाचा राहील. जास्त तापमान असलेल्या परिस्थितीत पाणी शक्यतोवर सकाळी किंवा सायंकाळी दिल्यास कमी पाण्यात वेलीची गरज पूर्ण करणे शक्य होईल. याकरिता ड्रीपलाइन जमिनीच्या जवळपास असावी. जेणेकरून पाणी देतेवेळी एकाच ठिकाणी पाणी पडेल व इकडे तिकडे उडणार नाही. जास्त तापमान असलेल्या परिस्थितीत वाऱ्याचा वेगदेखील वाढलेला दिसून येतो.

२) ॲण्टिस्ट्रेसचा वापर महत्त्वाचा ः
वाढत असलेल्या तापमानामुळे पानांद्वारे बाष्पीभवनाच्या माध्यमातून पाणी निघून जाईल आणि जमिनीतून पाण्याची गरज तितक्याच प्रमाणात वाढेल. हा समतोल राखणे शक्य न झाल्यास मण्याचा आकार कमी राहील व द्राक्षात गोडी लवकर येईल. याकरिता ॲण्टिस्ट्रेसची फवारणी वेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार २ ते ३ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे करता येईल.

३) कॅनॉपीचे संतुलन महत्त्वाचे ः
सध्याच्या स्थितीत पाणी कमी असलेल्या बागांमध्ये पुढील काळातही पाण्याची समस्या जाणवू शकते. अशा परिस्थितीत कॅनॉपीचे संतुलन महत्त्वाचे असेल. उपलब्ध पाण्याचा विचार करून काही प्रमाणात कॅनॉपी व घडांची संख्या निर्धारित करावी. उदा. २५ टक्के पाणी कमी असल्यास किमान १० टक्के कॅनॉपी कमी करावी.

ब) नुकत्याच छाटणी झालेल्या बागेतील व्यवस्थापन ः
या बागांमध्ये फळछाटणी साधारणतः सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झाली असावी. अशा बागेत काही ठिकाणी घड निघून फेलफुटी काढण्याची अवस्था असेल तर काही ठिकाणी प्रीब्लूम ते फुलोरा अवस्था असेल. फेलफुटी काढण्याच्या अवस्थेतील बागेत कॅनॉपीचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे असेल.

दरवर्षी बागेत घड कुजण्याची किंवा डाऊनी मिल्ड्यूमुळे बागेतील पिकाचे नुकसान झाल्याचे चर्चा होते. सध्या दिवसाचे तापमान वाढत असल्यामुळे बागेत आर्द्रता कमी असेल. येत्या आठवड्यात देखील पावसाची शक्यता नसल्याने पुन्हा बागेतील आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. तरीदेखील बऱ्याच भागांत सकाळी बागेत दव पडून पाने पूर्ण ओली झालेली दिसून येतील.

जास्त प्रमाणात दव जास्त काळ टिकून राहिल्यास पानांवरून दवाचे पाणी घसरून जाण्याची शक्यता असते. अशावेळी पानांवरून पडणारे पाणी प्रीब्लूम अवस्थेतील घडांमध्ये साचल्यास कुजेची समस्या होण्याची शक्यता असते.

काही बागेत जर यापूर्वीचे डाऊनी मिल्ड्यूचे बीजाणू उपलब्ध असल्यास, वाढत असलेल्या दवांमुळे याचा प्रसार होऊन घडापर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल. या वातावरणात वेलीचा जोमदेखील जास्त प्रमाणात वाढत असल्याचे अनुभवास येईल. यामुळे प्रीब्लूम अवस्थेत सहजच कॅनॉपी जास्त प्रमाणात दिसेल. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील...

१) फेलफुटी त्वरित काढून घ्याव्यात ः
आवश्यक तितके घड ठेवून इतर घड काढून टाकावेत. घडाच्या खाली तळातील दोन ते तीन पाने काढून घ्यावीत. असे केल्यास कॅनॉपीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन रोगाचा प्रसार कमी होईल. व फवारणीचे कव्हरेज चांगले झाल्यामुळे रोगनियंत्रण चांगले होईल.

२) वाढ नियंत्रण महत्त्वाचे...
या वेळी वाढ नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असेल. त्याकरिता पालाशयुक्त खताचा वापर करता येईल. ०ः४०ः३७ हे २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या तीन दिवसांच्या अंतराने करून घ्याव्यात. ठिबकद्वारे ०ः९०ः४६ एक किलो प्रति एकर प्रति दिवस प्रमाणे ४ ते ५ दिवस उपलब्धता करावी. वेलीच्या वाढीचा जोम लक्षात घेता खतांची उपलब्धता कमी अधिक करता येईल.

३) रोगनियंत्रण महत्त्वाचे ः
वेलीची पाने ओली असलेल्या परिस्थितीत बुरशीनाशकांची फवारणी केल्यास फवारणी द्रावण पानांवरून लवकर निघून जाईल आणि परिणाम मिळणार नाही. अशावेळी पाने सुकल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी आधी करून (कॉपरयुक्त बुरशीनाशके २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) त्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करता येईल. पाने ओली असलेल्या परिस्थितीत मॅन्कोझेबची धुरळणी जास्त परिणामकारक राहील. पाने ओली असताना जैविक नियंत्रणाचा वापर करणे गरजेचे समजावे. त्यासाठी मांजरी वाइनगार्ड २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे ३ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या केल्यास रोगनियंत्रण सहज सोपे होईल. झिंक आणि बोरॉन प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी.


मणी सेटिंग झालेल्या अवस्थेतील द्राक्ष घडाचे या वेळी थिनिंगचे नियोजन महत्त्वाचे असते. प्रीब्लूम अवस्थेत घडाचे थिनिंग केले असले, तरी आता मणी थिनिंग करणे फायद्याचे राहील. द्राक्ष जातीनुसार घडांमध्ये मण्यांची संख्या निर्धारित करून इतर मणी काढून घ्यावेत. प्रत्येक घडांमध्ये साधारणतः १० ते १२ पाकळ्या पुरेशा असतात. प्रत्येक पाकळीमध्ये ८ ते १० मणी असल्यास एका घडात साधारणतः १०० ते ११० मणी थॉमसन सीडलेस, तास ए- गणेश, क्लोन २ ए या जातीकरिता पुरेसे होतात. नानासाहेब पर्पल या द्राक्ष जातीत ७० ते ७५ मणी, तर रेड ग्लोबमध्ये ६० ते ६५ मणी प्रति घड पुरेसे होतील.

४) बागेत वाढ खुंटण्याची समस्या ः
बऱ्याचशा बागेत प्रीब्लूम किंवा त्यापूर्वीच्या अवस्थेत नवीन फुटी निघत असताना वाढ अचानक थांबलेली, वाढ कोमेजलेली तर काही परिस्थितीत पानाच्या वाट्या होत असल्यासारखी समस्या दिसून येते. ही समस्या काही भागांतच दिसून येते. वेलीची वाढ होण्याकरिता किंवा घडाचा विकास चांगला होण्याच्या दृष्टीने बऱ्याचशा संजीवकांचा, विद्राव्य खतांचा वापर बऱ्यापैकी केला जातो. यांची मात्रा शिफारशीपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त होत असल्यास अडचणी येतात.

प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी आल्यानंतर त्या वेलीवर तणनाशकांचे काही अंश असल्याचे लक्षात येते. तणनाशकांची फवारणी केली नसली तरीदेखील काही खते किंवा रसायनांमधून याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. तेव्हा ही परिस्थिती टाळण्याकरिता खात्रीलायक खते किंवा फवारणीसाठी रसायनांचा वापर करावा. त्याचा वापर करण्यापूर्वी त्यातील घटक तपासून खात्री करून घ्यावी. ही लक्षणे बागेत दिसताच कॅनॉपीनुसार १ ते २ ग्रॅम युरिया प्रतिलिटर पाणी याप्रमाणे १ ते २ वेळा फवारणी करावी. बागेत थोड्या प्रमाणात पाणी वाढवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT